Car Sakal
विज्ञान-तंत्र

Car Offers: २०२३ चे स्वागत करा नवीन गाडीने, Renault च्या 'या' कारवर तब्बल ५० हजारांची सूट

नववर्षाच्या निमित्ताने स्वस्तात गाडी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. रेनॉल्टच्या कारवर ५० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Discount on Renault Cars: नववर्षाच्या निमित्ताने कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. तुम्ही वर्षातील शेवटच्या महिन्यात रेनोच्या कारला आकर्षक ऑफरसह खरेदी करू शकता. या ऑफर्सचा फायदा तुम्ही ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत घेऊ शकता. डिस्काउंट ऑफर्स अंतर्गत कंपनी कॅश डिस्काउंटसोबतच एक्सचेंज ऑफर्स आणि कॉर्पोरेट बोनस देखील देत आहे. कंपनीच्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे, ते जाणून घेऊया.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

रेनो क्विडवर बंपर डिस्काउंट

रेनो क्विड ही लहान हॅचबॅक असून, भारतीय ग्राहकांकडून या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये क्विडवर ३५ हजार रुपये ऑफर दिली जात आहे. कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ठराविक व्हेरिएंट्सवर १० हजार रुपये कॅश डिस्काउंट, १० हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आणि १५ हजार रुपये एक्सचेंज बोनसचा फायदा मिळत आहे. तसेच, ग्रामीण ऑफर अंतर्गत शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ५ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. रेनो क्विडची एक्स-शोरूम किंमत ४.६४ लाख रुपयांपासून सुरू होते.

रेनो ट्रायबर

रेनोच्या सर्वात कमी किंमतीत येणाऱ्या या ७ सीटर कारवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. डिसेंबर महिन्यात ट्रायबरच्या खरेदीवर ५० हजार रुपयांपर्यंत बचत होईल. कारच्या ठराविक व्हेरिएंट्सवर १५ हजार रुपये कॅश डिस्काउंट, २५ हजार रुपये एक्सचेंज बेनिफिट्स आणि १० हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे. ग्रामीण ऑफर अंतर्गत शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ५ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. या एमपीव्ही ट्रायबरची सुरुवाती एक्स शोरुम किंमत ५.९१ लाख रुपयांपासून सुरू होते.

रेनो काइगर

रेनो काइगरवर देखील ३५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. तसेच, १० हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आणि १० हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट दिले जात आहे. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल व शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असल्यास ५ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. काइगरच्या काही व्हेरिएंटवर दोन वर्षांची अतिरिक्त वॉरंटी देखील दिली जात आहे. रेनोच्या या एमपीव्हीची सुरुवाती एक्स शोरुम किंमत ५.९९ लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganga Godavari Maha Aarti : नाशिकमध्ये आज गंगा-गोदावरी महाआरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा, वाहतुकीत मोठे बदल

Pavitra Portal News: ‘पवित्र’ पोर्टलचा गोंधळ! निवड होऊनही ८०% शिक्षक रुजू नाहीत, विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर!

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

Palghar Road Construction Delay : गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग संकटात! कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

8 वर्षापूर्वीच CM होणार हे विजयला माहित होतं? थलापतीच्या विजयानंतर गाडीची नंबरप्लेट व्हायरल

SCROLL FOR NEXT