Best Camera Mobile esakal
विज्ञान-तंत्र

Best Camera Mobile : कॅमेरा क्वालिटीवर व्हाल फिदा, स्मार्टफोन्सचे १५ हजारांपेक्षा कमी किंमतीचे ‘हे’ ऑप्शन्स आहेत बेस्ट

Best Camera Mobile : फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांना स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा हवा असतो. त्यामुळे, ते त्या प्रकारचा मोबाईल खरेदी करण्यावर भर देतात.

Monika Lonkar –Kumbhar

Best Camera Mobile : आजकाल स्मार्टफोन्समध्ये विविध कंपन्यांच्या आकर्षक आणि आधुनिक फीचर्स असलेल्या मोबाईल्सचा समावेश दिसून येतो. आधुनिक फीचर्स आणि उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन लोकांच्या पसंतीस उतरतो.

त्यातल्या त्यात फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांना स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा हवा असतो. त्यामुळे, ते त्या प्रकारचा मोबाईल खरेदी करण्यावर भर देतात. जर तुम्ही देखील चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

कारण आज आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसणारा आणि उत्तम कॅमेरा असलेल्या मोबाईल्सबद्दल सांगणार आहोत. हे मोबाईल तुम्हाला १५ हजारांपेक्षा ही कमी किंमतीमध्ये मिळू शकतील. कोणते आहेत हे स्मार्टफोन्स? चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोन्सबद्दल.

सॅमसंग गॅलक्सी M 15 5G

सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये 6.5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेटीसोबतच 50 MP (F1.8) चा मेन वाइड अँगल कॅमेरा आहे. यासोबतच 5 मेगापिक्सेल्सचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे.

सेल्फी कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास या मोबाईलमध्ये खास सेल्फीसाठी १३ MP (F2.0) कॅमेरा आहे. असा हा तगडा कॅमेरा असलेला स्मार्टफोन तुम्ही केवळ १५ हजारांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला २ व्हेरिएंट स्टोरेजचे पर्याय मिळतील.

Realme 12x 5G स्मार्टफोन

रिअल मी कंपनीचा हा स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या बाबतीत तगडा आहे. या मोबाईलच्या मागील पॅनेलवर 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 2MP चा दुसरा सेन्सर उपलब्ध आहे. आता सेल्फीसाठी बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा मोबाईल ३ स्टोरेज प्रकारांमध्ये येतो. ज्यामध्ये 4GB+128GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB हे स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. असा हा तगडा स्मार्टफोन तुम्हाला १५ हजारांपेक्षा ही कमी किंमतीमध्ये खरेदी करता येईल. ऑनलाईन किंवा दुकानात जाऊन तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या पहिल्या राष्ट्रीय शोकांतिकेवर आधारित भयपटात अहान शेट्टी मुख्य भूमिकेत !

OBC Reservation: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता ‘ओबीसीं’साठीही स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आंदोलकांनी शांतता पाळावी- छगन भुजबळ

Dhule News : विनापरवाना खतविक्री करणाऱ्यावर धुळ्यात कारवाई; शेतकरी आणि शासनाची फसवणूक

Jalgaon News : जळगाव लवकरच महाराष्ट्राची 'ऊर्जा राजधानी'; जिल्हा प्रशासनाचा दावा

SCROLL FOR NEXT