smartphone sakal
विज्ञान-तंत्र

Buying a used smartphone: जुना फोन खरेदी करताय? 'या' गोष्टी तपासा, अन्यथा होईल नुकसान

अनेकजण जुना स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. परंतु, जुना स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Guide To Buying Second Hand Phones: अनेकांना दमदार फीचर्ससह येणारा महागडा फोन खरेदी करायचा असतो. परंतु, बजेट कमी असल्याने फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करणे शक्य होत नाही. अशावेळी अनेकजण जुना स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, जुना फोन खरेदी करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जुना फोन खरेदी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष न दिल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जुना फोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, त्याविषयी सविस्तर जाणून घ्या.

फोन खरेदी करण्याआधी वापरून पाहा

जुना फोन आपल्याला खूप कमी किंमतीत मिळत असतो. अशावेळी आपण फोन न तपासताच खरेदी करतो. मात्र, फोन न तपासता खरेदी केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. जुना फोन खरेदी करायला गेल्यास तो वापरून पाहा. कमीत कमी १५ मिनिटात त्यातील अ‍ॅप्स ओपन करून पाहा. तसेच, प्रोसेसिंग पॉवर, फ्रेम रेट, टच स्क्रीन, हँगिंग प्रॉब्लम, बॅटरी हिटिंग आणि कॅमेरा परफॉर्मेंस देखील नक्की पाहा.

फोन विकणाऱ्याला भेटा

तुम्ही जर जुना फोन खरेदी करायला जात असल्यास विक्री करणाऱ्याची नक्की भेट घ्या. अनेकदा फोन विकताना सांगितलेल्या गोष्टी खोट्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही स्वतः त्या व्यक्तीची भेट घेऊन सर्व गोष्टी तपासून पाहू शकता.

फोनचे पार्ट्स तपासा

फोन खरेदी करण्याच्या गडबडीत आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मात्र, खरेदी करताना जुन्या फोन्सचे पार्ट्स नक्की पाहा. स्क्रीन, फोनच्या बॉडीवर कोणतेही स्क्रॅच तर नाही हे पाहा. याशिवाय पोर्ट, माइक, स्पीकर आणि कॅमेरा सारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. हे पार्ट्स व्यवस्थित काम करत नसल्यास फोन वापरताना मोठे नुकसान होऊ शकते.

बिल नक्की घ्या

सेकंड हँड फोन खरेदी करताना फोनचे इनवॉइस बिल आणि रिटेल बॉक्स घ्यायला विसरू नका. बिल दिल्यास त्यावरील IMEI Number आणि फोनचा IMEI नंबर नक्की पाहा. फोनचा IMEI नंबर जाणून घेण्यासाठी *#06# डायल करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT