this diwali on dhanteras know how to buy digital gold on google pay paytm Google
विज्ञान-तंत्र

Diwali 2021 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी करा डिजिटल सोनं

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी, धनत्रयोदशी या सणांना सोने खरेदी करण्याची आपल्याकडे प्रदीर्घ परंपरा आहे. मात्र आता कालांतराने सोन्यात गुंतवणूक ही अनेक मार्गांनी केली जाऊ शकते. म्हणजेच आता फक्त दुकानात जाऊन सोने खरेदी करणे इतकाच एक मार्यादीत पर्याय राहिलेला नाही. आता तुम्ही डिजिटल सोने देखील खरेदी करु शकता. डिजिटल सोने खरेदी अगदी सोपी असून तुम्ही ते Google Pay आणि Paytm सारख्या अॅप्सवरून खरेदी करू शकता.

अलीकडच्या काळात प्रत्यक्ष म्हणजे भौतिक स्वरूपातील (Physical Form Gold) सोने खरेदी करण्यापेक्षा डिजिटल सोन्यात (Digital Gold) गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. याचे कारण म्हणजे पेटीएम, गुगल पे, फोनपे इत्यादी ई-वॉलेट्स त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे अगदी 100 रुपये इतक्या कमी रकमेत डिजिटल सोन्यात गुंतवणुकी करण्याचे ऑप्शन उपलब्ध आहेत. डिजिटल सोने खरेदी केल्यानंतर तुम्ही खरेदी केलेल्या सोने तुम्ही रिझर्व्ह करु शकता आणि ते तुमच्या डिजिटल खात्यावर रजिस्टर केले जाते.

तुम्हाला याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे सोने तिजोरीत जपून ठेवण्याची गरज पडत नाही. डिजिटल सोने पूर्णपणे ट्रेडिंग कंपनीद्वारे सांभाळले जाते आणि त्यांच्याद्वारेच सुरक्षित ठेवले जाते. तुम्ही Google Pay किंवा Paytm वरून खरेदी केली तरीही, सोने तुमचेच राहते आणि तुम्हाला या अॅप्सवर फक्त मध्यस्थ शुल्क द्यावे लागते. या डिजीटल सोन्याची किंमत ही वास्तविक सोन्यासारखीच असते आणि म्हणूनच, आपण आपल्या इच्छेनुसार ते विकू शकता. डिजिटल सोन्यावरील परतावा तुम्हाला प्रत्यक्ष सोन्यापासून मिळतो तसाच असतो.

डिजिटल सोने: कसे खरेदी करावे

डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही Google Pay किंवा Paytm वापरू शकता.

  • Google Pay उघडा आणि गोल्ड लॉकर पर्यायावर नेव्हिगेट करा.

  • गोल्ड लॉकरच्या मध्ये, तुमच्याकडे एक डॅशबोर्ड दिसेल जो सोन्याच्या रकमेशी संबंधित सर्व माहिती दाखवतो. तुम्ही याआधी कोणतीही खरेदी केली असल्यास, ते येथे दाखवले जाईल.

  • तुम्हाला अॅपवरून सोने खरेदी करण्याचा पर्याय देखील मिळेल. या बटणावर क्लिक करा.

  • आता तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असलेली रक्कम एंटर करा. एकदा आपण रक्कम एंटर केल्यानंतर, आपण त्या पैशासाठी किती सोने खरेदी करू शकता हे आपल्याला दाखवले जाईल. हे बाजारातील सोन्याच्या सध्याच्या दरावर अवलंबून असेल परंतु जीएसटी रक्कम यातून वगळली असेल.

  • यापुढे तुम्हाला तुमच्या पसंतीच्या व्यवहाराच्या पद्धतीनुसाप व्यवहार प्रक्रिया फॉलो करावी लागेल.

  • व्यवहार पूर्ण झाल्यावर, डिजिटल सोन्याची रक्कम तुमच्या गोल्ड लॉकरमध्ये जोडली जाईल.

  • -एकदा तुम्ही सोने खरेदी केल्यानंतर, तुम्हाला गोल्ड लॉकरमध्ये सोने विकण्याचे किंवा डिलीव्हर करण्याचे पर्याय देखील मिळतात. या प्रक्रिया बाजार दरांवर आधारित असतील.

  • तुम्ही डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी कोणतीही थर्ड पार्टी सर्व्हिस निवडताना, तुम्ही GST दर आणि इतर संबंधित शुल्कांसह वापराच्या अटी आणि पॉलिसी तपासल्या पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT