Threads App eSakal
विज्ञान-तंत्र

Meta Threads App : सगळ्यांसोबत थ्रेड्स जॉईन करायचंय? गडबडीत चुकीचं अ‍ॅप डाऊनलोड करू नका, बसेल मोठा फटका

How to Download Thread App : एका दिवसात ३० मिलियनहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे.

Sudesh

Twitter Update : ट्विटरला टक्कर देण्यासाठी मेटाने आपलं थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच केलं आहे. अवघ्या एका दिवसात ३० मिलियनहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. तुम्हाला देखील इतरांसोबत हे अ‍ॅप घेऊ वाटत असेल, तर थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे.

इन्स्टाग्रामचं थ्रेड्स हे अ‍ॅप सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र, गुगलच्या प्ले स्टोअरवर थ्रेड्स असं सर्च केल्यानंतर कित्येक अ‍ॅप्सचे पर्याय समोर येत आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या क्रमांकावर जे अ‍ॅप येतंय ते इन्स्टाग्रामचं थ्रेड्स नसून दुसरंच एक अ‍ॅप आहे.

असा ओळखा फरक

गुगल प्ले स्टोअरवर सगळ्यात वरती दिसणारं थ्रेड्स अ‍ॅप हे दुसऱ्याच एका कंपनीने बनवलेलं आहे. याचा आयकॉन निळ्या-जांभळ्या अशा रंगाचा आहे. शिवाय याच्या डेव्हलपरचं नाव threads android team असं दिलं आहे. याचा इन्स्टाग्राम किंवा मेटाशी काहीही संबंध नाही.

तर दुसरीकडे इन्स्टाग्रामचं जे थ्रेड्स अ‍ॅप आहे, त्याचा लोगो काळ्या रंगाचा आहे. त्यावळ तामिळ/मल्याळम अक्षरासारखं एक डिझाईन देण्यात आलं आहे. याच्या डेव्हलपरचं नाव Instagram Inc. असं दिलेलं दिसून येईल. शिवाय या अ‍ॅपचं नावही Threads by Instagram असं देण्यात आलेलं आहे. हेच अ‍ॅप खरं असून, तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.

कोण वापरू शकतं थ्रेड्स?

थ्रेड्स वापरण्यासाठी तुमच्याकडे इन्स्टाग्राम अकाउंट असणं गरजेचं आहे. तुमचे इन्स्टाचे लॉग-इन वापरून तुम्ही थ्रेड्स अकाउंट वापरू शकता. यावर तुम्ही ५०० कॅरेक्टरची पोस्ट करू शकता. ट्विटर प्रमाणेच यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT