tips internet safety while browsing online security 
विज्ञान-तंत्र

इंटरनेटचा वापर करताना सुरक्षेचा धोका सतावतोय? मग या ट्रिक्‍स वापरून पाहा... 

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार मानवाच्या आयुष्यातही आमूलाग्र बदल झाले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुसह्य बनले आहे. हवी ती गोष्ट काही वेळात उपलब्ध होत आहे. यात इंटरनेटचा खूप मोलाचा वाटा आहे. तुम्हाला काय हवे ते इंटरनेट उपलब्ध करून देते. माहितीचे आदान-प्रदानही इंटरनेटमुळे वेगाने होत आहे. अर्थातच, इंटरनेट ही मानवी जीवनासाठी महत्त्वपूर्ण बाब बनली आहे. असे असले तरी या इंटरनेटमुळे काही आव्हानेही समोर आली आहेत. माणसाच्या खासगी आयुष्याला धोका आणि डेटा चोरीसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. 

तुम्ही ऑनलाईन असताना तुम्हाला हे धोके जास्त भेडसावू शकतात; परंतु जास्त घाबरण्याची आवश्‍यकता नाही. कारण आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत, की ज्यामुळे तुमचे खासगी आयुष्यही धोक्‍यात येणार नाही आणि तुमचा डेटाही चोरी होणार नाही. 


ब्राउजिंग करताना इंकोग्निटो मोडचा वापर करा 

इंकोग्निटो मोडमध्ये ब्राउजरचा वापर केला तर तुमची ब्राउजिंग हिस्ट्री खासगी राहू शकते. इंकोग्निटो मोड (Incognito Mode) हा ब्राउजिंग करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. हा मोड गुगल क्रोमा, मायक्रो एज (Microsoft Edge) आणि Firefox सारख्या सर्व बाउजरवर उपलब्ध आहे. इंकोग्निटो मोडमध्ये तुमची तात्पुरती हिस्ट्री फाईल आणि कूकीज गुप्त राहते. 

पासवर्ड महत्त्वाचा 

तुम्ही इंटरनेट वापरत असताना तुमची खाती सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला नियमित पासवर्ड बदलणे खूप गरजेचे आहे. शिवाय अनेक ऍप किंवा साईट्‌ससाठी एकच पासवर्ड ठेवू नका. 

लोकेशन ऑफ ठेवा 
तुम्ही ज्यावेळी एखाद्या ऍपचा वापर करत असाल त्यावेळी जर तुमच्या स्क्रीनवर लोकेशन पॉप अप करण्यासाठी नोटिफिकेशन आले तर ते स्वीकारू नका. त्याऐवजी तुमच्या मोबाईल सेटिंगमध्ये जावा आणि लोकेशन ऑफ करून ठेवा. 

सुरक्षेसाठी व्हीपीएनचा वापर करा 
तुम्हाला सतत इंटरनेटचा वापर करावा लागत असेल तर तुम्हाला सुरक्षा देण्यासाठी व्हीपीएन आहे. व्हीपीएनच्या वापरामुळे तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहील. व्हीपीएन (VPN) तुम्हाला एक वेगळा आयपी पत्ता देते, ज्यामुळे तुम्ही ऑनलाईन करत असलेल्या गोष्टी लपवून ठेवण्यास मदत होते. 

जाहिरातींवर क्‍लिक करू नका 

तुम्ही इंटरनेटचा वापर करत असताना तुमच्या स्क्रिनवर अनेक जाहिराती येत असतात. चुकूनही या जाहिरातींवर क्‍लिक करू नका. हॅकर्स अशा जाहिराती पाठवून तुम्हाला अनेक आमिषे दाखवतात. जसे की, कॅश मिळवा, मोफत हॉलिडे ट्रीप एन्जॉय करा, अशा अनेक ऑफर दिल्या जातील. यातून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा जाहिरातींपासून दूर राहा. 


अनोळखी रिक्‍वेस्ट स्वीकारू नका 
तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा लिंक्‍डइनसारख्या साईटवर अनोळखी व्यक्तींच्या रिक्‍वेस्ट येत असतील तर त्यांचा स्वीकार करू नका. तुमच्या जवळच्या काही गोष्टी मिळविण्यासाठी हॅकर्स तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये येत असतात. तुमची माहिती एकत्रित करून त्याचा चुकीच्या कामासाठी वापर करत असतात. त्यामुळे अशा अकाउंटना ब्लॉक करून टाका. 

नोटिफिकेशनकडे दुर्लक्ष करा 

तुम्ही ऑनलाईन ब्राउजिंग करत असताना स्क्रिनवर अनेक नोटिफिकेशन येत असतात, ज्या तुम्हाला आकर्षित करतात आणि तुम्ही त्याला भुलून त्यावर क्‍लिक करता. अशा पॉप-अपमध्ये हानिकारक सॉफ्टवेअरचा वापर केलेला असतो. ते तुमच्या सिस्टीमचा वेग कमी करतील. 

चुकूनही कधी या गोष्टी करू नका 
तुम्ही अनेक वेळा ऑनलाईन साईटवरून खरेदी करत असता. अशा वेळी तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती सेव्ह केली जाते. तुमची ही माहिती सेव्ह केली जाणार नाही, याची काळजी घ्या. हॅकर्स तुमचा बॅंक बॅलन्स पाहून तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात. 

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT