Robot's Alleged Suicide Shocks South Korea esakal
विज्ञान-तंत्र

Trending : पहिल्यांदाच घडलं असं! कामाला कंटाळलेल्या चक्क रोबोटने दिला जीव; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Robot Malfuction : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या गुमी शहराच्या नगर परिषदेत रोबोट कर्मचारी रुजू झाला होता

Saisimran Ghashi

South Korea : दक्षिण कोरियाच्या गुमी शहराच्या नगर परिषदेत काम करणारा रोबोट कर्मचारी अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली आहे. या रोबोटने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध सुरू आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या गुमी शहराच्या नगर परिषदेत रोबोट कर्मचारी रुजू झाला होता. तो दररोज कागदपत्रांची वाहतूक करणे, शहराचा प्रचार करणे आणि स्थानिक रहिवाशांना माहिती देणे अशी कामे करत होता. अगदी कामावर येण्यासाठी त्याचा स्वतःचा एक वेळापत्रक होता. सकाळी ९ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत तो काम करत असे. इतकेच नाही तर लिफ्ट बोलवण्यासारखी कामे तो स्वतंत्रपणे करू शकत होता.

परंतु काही दिवसांपूर्वी तो दुसऱ्या मजल्यावर जाताना अचानक कोसळला आणि बंद पडला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, कोसळण्याआधी तो काही वेळ एका जागी फिरत होता. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करत आहे.

काहींचा तर असा दावा आहे की, रोबोटने कामाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. काहींनी तर रोबोटलाही विश्रांतीची गरज असते, सुट्टी हवी आणि युनियनची गरज असते असे म्हटले आहे.

दरम्यान, अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. रोबोटच्या मोड्यूलची तपासणी केली जाणार आहे. या घटनेनंतर सध्यातरी दुसरा रोबोट ठेवण्याचा विचार नगर परिषदेचा नाही.

दक्षिण कोरियामध्ये रोबोट्सचा विविध क्षेत्रात वापर वाढत आहे. मात्र, अशी घटना यापूर्वी घडली नव्हती. त्यामुळे ही घटना सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT