esakal
विज्ञान-तंत्र

Apli PMPML App : ‘आपली पीएमपीएमएल’ अ‍ॅपवर दिसणार सर्व बस,सोबत एक खास फीचर होणार अ‍ॅड

‘पीएमपीएमएल’च्या ॲपवर नसणाऱ्या उर्वरित ९१६ बस या अ‍ॅपला डिसेंबरपर्यंत जोडल्या जाणार आहेत. त्‍यामुळे प्रवाशांना बसचे लोकेशन दिसणार आहेत.

CD

पिंपरी, ता. २४ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे लाइव्ह लोकेशन, बस किती वेळेत थांब्यावर येणार, अशी सर्व माहिती प्रवाशांना ‘आपली पीएमपीएमएल’ या अ‍ॅपवर दिसणार आहे. ‘पीएमपीएमएल’च्या ॲपवर नसणाऱ्या उर्वरित ९१६ बस या अ‍ॅपला डिसेंबरपर्यंत जोडल्या जाणार आहेत. त्‍यामुळे प्रवाशांना बसचे लोकेशन दिसणार आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. पीएमपीकडून १ हजार ६५० ते १ हजार ७०० बसमार्फत ३७१ मार्गांवर सेवा दिली जाते. दिवसाला साधारण १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांना दिसावे, ऑनलाइन तिकीट काढता यावे व ऑनलाइन तक्रार करता यावी म्हणून ‘आपली पीएमपीएमएल’ हे अॅप विकसित केले होते. ते १५ ऑगस्टपासून सुरू झाले.

ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी आयटीएमएस सिस्टिम, बस थांब्याचे लोकेशन दाखविणारी यंत्रणा विकसित केली आहे. यासाठी १ हजार ३० पीएमपी बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस) यंत्रणा बसवली आहे.

ही यंत्रणा बसवली ९१६ बसमध्ये नव्‍हती. त्यामुळे या बसचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांना दिसत नाही. काही मार्गांवर या अ‍ॅपचा बसचे लोकेशन पाहण्यासाठी उपयोग होत नाही, अशा तक्रारी प्रवाशांच्‍या होत्‍या. मात्र त्‍या बसही आता ॲपवर घेतल्‍या जाणार असल्‍याची माहिती, पीएमपीचे सहव्‍यवस्‍थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT