Best 10 Mobile Phones in 2024 esakal
विज्ञान-तंत्र

Top 10 Mobiles in 2024 : आयफोन 16 पासून वनप्लस Nord 4 पर्यंत, 'या' 10 स्मार्टफोन्सनी गाजवलं 2024 हे वर्ष

Top 10 Smartphones in 2024 : यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 या वर्षात लाँच झालेल्या टॉप 10 मोबाईल फोन कोणते आहेत जाणून घ्या.

Saisimran Ghashi

Best Mobile Phones in India 2024 : स्मार्टफोनच्या दुनियेत नवनवीन फोन लाँच होत असतात. त्यामुळे ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. काहींना आयफोन हवे असतात, तर काही सॅमसंग किंवा अँड्रॉइड फोन निवडतात. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 या वर्षात लाँच झालेल्या टॉप 10 मोबाईल फोन कोणते आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. Samsung Galaxy S24 Ultra – सर्वोत्तम स्मार्टफोन

जर किंमत मुद्दा नसेल, तर Galaxy S24 Ultra तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 6.8-इंच AMOLED डिस्प्ले, S Pen सपोर्ट आणि उत्कृष्ट बॅटरी आहे. या फोनला सात वर्षांचे OS आणि सुरक्षा अपडेट्स मिळतात.

2. Xiaomi 14 Ultra – सर्वोत्तम कॅमेरा फोन

Xiaomi 14 Ultra हा फोन DSLR चा उत्तम पर्याय मानला जातो. यात 50MP चे चार रियर कॅमेरे व 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेऱ्यांसाठी हा फोन सर्वोत्तम पर्याय आहे, परंतु त्याचा HyperOS काहीसा कमी प्रभावी वाटतो.

3. Oppo Find X8 Pro – ऑल राउंडर फोन

Oppo Find X8 Pro हा फोन उत्कृष्ट कॅमेरा, मोठी बॅटरी आणि सॉफ्टवेअर सुविधांसाठी ओळखला जातो.

4. Google Pixel 9 Pro XL

Google Pixel 9 Pro XL उत्कृष्ट कॅमेरा, AI फिचर्स आणि Android 14 सॉफ्टवेअरसह सर्वोत्तम अनुभव देते. हा फोन सात वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स देतो.

5. Apple iPhone 16 Plus

iPhone 16 Plus हा फोन मोठ्या स्क्रीनसह मध्यम किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये नवीन कॅमेरा कंट्रोल फीचर्स असून Action Button देखील आहे.

6. OnePlus Nord 4

OnePlus Nord 4 हा चांगले फीचर्स, 120Hz OLED डिस्प्ले, आणि मोठ्या बॅटरीसह येतो. मध्यम किंमतीच्या फोनसाठी हा उत्तम पर्याय आहे.

7. Motorola Razr 50 Ultra – सर्वोत्तम फोल्डेबल फोन

Motorola Razr 50 Ultra हा फोल्डेबल फोन मोठ्या 4-इंच बाह्य स्क्रीनसह येतो. हा फोन फोल्डेबल डिझाइनसाठी उत्कृष्ट पर्याय आहे.

8. Apple iPhone 16 Pro Max

iPhone 16 Pro Max हा फोन उच्च दर्जाच्या डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, आणि मोठ्या बॅटरीसह येतो.

9. Google Pixel 9

Google Pixel 9 हा AI तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. परवडणाऱ्या किमतीत हा फोन उत्तम काम करतो.

10. CMF Phone 1 – सर्वोत्तम बजेट फोन

CMF Phone 1 हा फोन आकर्षक डिझाइन, चांगले फीचर्स आणि कमी किमतीत उपलब्ध आहे. हा फोन स्वस्त दरात उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला मायदेशी परतले; दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Sunday Special Healthy Breakfast: रविवारी बनवा स्पेशल गुजराती नाश्ता; लिहून घ्या चवील मस्त अशा पालक पुडलाची रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 ऑगस्ट 2025

लंबी रेस का घोडा!

परभणीचे ‘बारव’ वैभव

SCROLL FOR NEXT