TRAI digital connectivity rating system : आजकाल घर किंवा ऑफिसमध्ये चांगले इंटरनेट कनेक्शन मिळणे किती महत्त्वाचे आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. मात्र अनेकदा नवीन घर किंवा ऑफिसेसमध्येही नेटवर्कची समस्या भेडसावते. यावर तोडगा म्हणून भारतातील टेलिकॉम नियामक प्राधिकरण TRAI एक नवा ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी रेटिंग’ सिस्टम सुरू करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरांच्या किंवा ऑफिसच्या डिजिटल कनेक्टिव्हिटीची माहिती मिळेल आणि ती पाहूनच खरेदी किंवा भाड्याने घेण्याचा निर्णय घेता येईल.
TRAI ने घोषणा केली आहे की, पाच कंपन्यांनी डिजिटल कनेक्टिव्हिटी रेटिंग एजन्सीज (DCRA) होण्यासाठी अर्ज केले आहेत. या एजन्सीजना TRAI प्रमाणित करून इमारतींच्या कनेक्टिव्हिटीचे मूल्यांकन करायला सांगितले जाईल. TRAI चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, ही सिस्टम लवकरच सुरु होणार आहे आणि या महिन्याभरात पहिल्या एजन्सीजची निवडही होऊ शकते.
हा रेटिंग सिस्टम ‘ग्रीन बिल्डिंग’ किंवा ‘एनर्जी एफिशियंसी’ प्रमाणे असेल, पण तो डिजिटल कनेक्टिव्हिटीवर आधारित असेल. नव्या बांधकामांबरोबरच जुन्या इमारतींना देखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या इमारतींमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी काम होईल आणि त्यांना चांगली रेटिंग मिळण्याची शक्यता वाढेल.
TRAI ने यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत आहे, जिथे इमारतींच्या कनेक्टिव्हिटीचा तपशील आणि अंतिम मूल्यांकन उपलब्ध असेल. इमारतींचे मूल्यांकन फाइबर रेडीनेस, मोबाईल नेटवर्क उपलब्धता, बिल्डिंगमधील नेटवर्क उपाययोजना (In-building solutions), Wi-Fi इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक निकषांवर केले जाईल.
आजच्या युगात विशेषतः शहरी भागात जिथे कनेक्टिव्हिटीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तिथे हे रेटिंग सिस्टम विकसकांसाठी विक्रीसाठी मोठा प्लस पॉइंट ठरेल. ग्राहकांना किंवा भाडेतत्त्वावर घेणाऱ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. लाहोटी यांनी यासाठी आवश्यक धोरणे आणि नियम आधीच लागू असल्याचे सांगितले आहे.
डिजिटल कनेक्टिव्हिटी 5G आणि येणाऱ्या 6G नेटवर्कच्या युगात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे TRAI अध्यक्षांनी स्पष्ट केले. कारण हायफ्रीक्वेन्सी बँड्सचा वापर होणार असून इमारतींच्या भिंती आणि इतर साहित्यांमुळे नेटवर्कवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नेटवर्क सुधारण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी इमारतींमध्ये योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे.
TRAI चा हा ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी रेटिंग’ प्रणालीचा प्रयत्न नव्या घर खरेदी करणाऱ्यांसाठी, भाडेतत्त्वावर घेणाऱ्यांसाठी आणि बांधकाम कंपन्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या नव्या योजनेमुळे भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटीचे स्तर सुधारण्यास चालना मिळेल आणि ग्राहकांना अधिक विश्वासाने घरं किंवा ऑफिस निवडता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.