विज्ञान-तंत्र

रोज TV पाहताय? पण त्यामागची कल्पना कोणाची होती माहितीये का?

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

आज इंटरेनट-मोबाईल फोन हे इतकं सहज-सोपं-स्वस्त झालंय की आपल्याला जिथं आहे तिथं बसल्या जागी शिक्षण-आरोग्य-मनोरंजन-कला-क्रिडा-साहित्य-विज्ञान इत्यादी विषयांचा जगभरातला हवा तो काॅंटेंट एका क्लिकवर उपलब्ध होतो. फार जुना काळ नाहीये आपण या सगळ्यासाठी बऱ्यापैकी एकट्या टिव्हीवर अवलंबून होतो. सातच्या बातम्या चुकल्या तर आज देशात काय झालं? मॅच कुणी जिंकली? काहीच कळायचं नाही.

जाहिरांतीची भाऊगर्दी असली तरी बहुतांश सिनेमे टिव्हीवर बघावे लागायचे. बालचित्रवाणी-कृषीदर्शन यासोबत अनेक प्रबोधनपर कार्यक्रमातून माहिती-ज्ञानात भर पडायची. टिव्हीचा उपयोग आताशा तुलनेत अत्यंत कमी झाला असला तरीही ही देखील एक वेगळीच दुनियादारी आहे. अनेक वाहिन्यांचा ह्यूज टिआरपी आहे. आताचा ‘टिव्ही’ आधीसारखा केवळ इडियट बाॅक्स नाही राहिला..तो ही केव्हाच ‘स्मार्ट टिव्ही’ झालाय. आता यातही यूट्यूब-नेटफ्लिक्स-प्ले स्टोर-गेम्स या सगळ्याचा सहज ॲक्सेस झालाय.

आजमितीस बिलियन डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या एवढ्या मोठ्या मनोरंजनविश्वात टिव्हीचही आपलं वेगळं स्थान आहेच. ‘टिव्ही’ हा मानवी इतिहासातला एक महत्वाचा शोध आहे याबाबत काहीच शंका नाही तेव्हा आज टिव्हीची गोष्ट सांगतोय हे एव्हाना तुमच्या लक्ष्यात आलंच असेल.

टिव्ही या संक्षेपी संज्ञेनं लोकप्रिय असलेला ‘टेलिव्हिजन’ हा सामान्यतः विविध काॅंटेट दाखवणारं भांडार असलं तरी तांत्रिकदृष्ट्या ते एक ‘दुरसंचार माध्यम साधन’ अर्थात टेलिकम्युनिकेशन मिडियम डिव्हाईस आहे जे सॅटेलाईट आणि रेडिओ संदेशाच्या सहाय्यानं स्थिरचित्र आणि चलचित्र यांचं आवाजासह प्रेषण करतं..

रेडिओचा शोध लागला तशी टिव्हीचीही चर्चा होऊ लागली. अगदी सर्वसामान्य लोकंही “आता आवाज ऐकू येतोय म्हणजे हळूहळू चित्रही दिसतील” असे स्वप्न बघू लागले पण टिव्हीचा शोध ‘फिलो टेलर फर्न्सवर्थ द्वितीय’ यानं लावला. भल्यामोठ्या लाकडी खोक्यात छोटसं कृष्णधवल चित्र दाखवणाऱ्या या डब्यात पुढं अनेक स्थित्यंतरं झाली.

आज आपल्या सर्वांच्या घरात जो टिव्ही आहे त्याचं श्रेय मात्र कुणा एकट्याला देता येणार नाही. कुणी थेअरी दिली-कुणी प्रयोग केले-कुणी नविन कल्पना मांडली-कुणी थेट काम केलं तेव्हा कुठं आजचा टिव्ही आहे तसा दिसतोय. या टिव्हीमागचं क्रेडिट नक्की कुणाचं? याचा शोध घेतला अस ता एक नाही तर अनेक नावं सापडतात. यातली महत्वाची दोन नावं म्हणजे वर उल्लेखलेला ‘फिलो’ आणि दुसरा जाॅन लाॅगी बायर्ड. यापैकी फिलो फर्न्सवर्थनं इलेक्ट्रॉनिक टिव्हीचा पाया रचला तो ही वयाच्या केवळ एकवीसाव्या वर्षी.

फिलोला असं यंत्र बनवायचं होतं जे चलचित्र टिपून त्यांना एका कोडमध्ये बदलेल आणि रेडिओ तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दुसऱ्या डिव्हाईसमध्ये पाठवता येईल. यात फिलोला संकल्पनेच्या पातळीवर यशही मिळालं. टिव्हीच्या शोधातलं दुसरं महत्वाचं नाव म्हणजे स्कॉटिश संशोधक जाॅन लाॅगी बायर्ड ज्यानं फिलोच्या संकल्पनेला मुर्त स्वरूप दिलं.

जाॅन तसं म्हटलं तर जन्मजात संशोधक. खेळता खेळता अगदी बालवयातच त्यानं घरात स्वत:ची संपर्क यंत्रणा तयार केली होती. लार्कफिल्ड अकादमीतून पदवी मिळवल्यानंतर जाॅननं ग्लासगोतल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि ओघानं तो ग्लासगो विद्यापीठातही दाखल झाला पण तेवढ्यात पहिल्या महायु्द्धाचं बिगूल वाजलं आणि जाॅनला नाईलाजानं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शिक्षण अर्धवट एकवेळ ठिक होतं. त्याचे समकालिन असलेल्या अनेकांची अशीच परिस्थिती होती.

जाॅन समोरचं आव्हान वेगळं होतं. तो तब्येतीनं बराच नाजूक होता. थोडी दगदग झाली-हवाबदल घडला की गडी वरचेवर आजारी पडायचा त्यामुळं पुढं त्यानं एका वीज कंपनीत अधिक्षकपदाची नोकरी स्विकारली. टिव्हीवर काम करण्याआधी जाॅननं ॲलेक्झांडर बेन, अर्थर कोर्न आणि पाॅल निपकोव यांच्या कामाचं अवलोकन करून टोपीचं खोकं-सायकलची ट्यूब-कात्री-सुया-डिंक-मेण हाती जे सामान येईल त्याच्या सहाय्यानं टिव्हीचा एक नमुना बनवला आणि त्याचं वैयक्तिक प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी एका आठवड्याचे पंचवीस युरो शुल्क निर्धारित केलं.

अर्थात यातलं तंत्र निर्दोष नसल्यानं नागरिकांचा प्रतिसादही संमिश्र राहिला..अनेकांनी तक्रारही नोंदवली-काहींना तर हा सगळा चक्क वेंधळेपणा वाटला पण ही मानवी इतिहासातली महत्वाची घटना होती.

काही वर्षातच जाॅननं टिव्हीत सुधारणा करत अनेक सकारात्मक बदल केले आणि १९२७ साली चक्क लंडनहून ग्लासगो या एकमेकांपासून तब्बल चारशे मैल अंतरात टिव्हीचं यशस्वी प्रक्षेपण केलं.

एवढं सगळं करूनही जाॅन कुठंतरी अतृप्त होता..त्याचे प्रयोग सातत्यानं सुरूच होते. 'या' सगळया प्रंपचातून त्यानं ‘स्टिरिओव्हिजन’ नावाची त्रिमितीय टिव्हीची संकल्पनांही मांडली. पुर्वी गावात एखाददुसरा टिव्ही असायचा आता घरटी तिनेक टिव्ही असतात. टिव्हीत क्वांटम किंवा ऑर्गॅनिक लाईट एमिशन-प्लेन एलईडी-एलसीडी-प्लाज्मा असे कितीतरी प्रयोग झाले असले तरी अनेक मराठी लोकं टिव्हीला आजही ‘दुरदर्शन’ म्हणतात. १९२५ साली आजच्याच दिवशी लंडन इथं जाॅन बायर्डनं टिव्हीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं त्या निमित्तानं सहज हा आढावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT