twitter bans over 45000 indian accounts you should not make these mistakes  
विज्ञान-तंत्र

'ट्विटर'कडून 45 हजारांहून अधिक भारतीयांची खाती बॅन, तुम्हीही टाळा या चुका

सकाळ डिजिटल टीम

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर एका महिन्याच्या आत 45 हजारांहून अधिक खाती बंद केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी आपला कंप्लायन्स अहवाल शेअर करताना कंपनीने म्हटले आहे की, जुलैमध्ये 45,191 भारतीय वापरकर्त्यांच्या ट्विटर खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या खात्यांवर वेगवेगळ्या कारणांमुळे बंदी घालण्यात आली आहे.

या अहवालानुसार, ट्विटरने बाल लैंगिक शोषणाचा प्रचार करणाऱ्या आणि अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्या 45,191 खात्यांवर बंदी घातली आहे. याशिवाय 2,366 खाती दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याच्या कारणावरून बंदी घालण्यात आली होती. Twitter आणि इतर प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नवीन IT नियम, 2021 नुसार त्यांचे मासिक कंप्लायंस अहवाल शेअर करतात.

ट्विटरने सांगितले की, 26 जून ते 25 जुलै या एका महिन्यात देशभरातील वापरकर्त्यांकडून 874 तक्रारी आल्या. तथापि, यापैकी केवळ 70 तक्रारींवर कारवाई करण्याची गरज वाटली. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने देशात आपला ग्रिव्हीयंस सेल सेटअप केला आहे, ज्याचे काम वापरकर्त्यांकडून येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे आणि त्यांचा अहवाल सरकारला सादर करणे हे आहे.

जूनमध्येही हजारो खात्यांवर बंदी

जूनमध्येही प्लॅटफॉर्मने 43,140 भारतीय खात्यांवर बंदी घातली होती.आम्ही प्लॅटफॉर्मवर त्यांचे विचार शेअर करण्यासाठी प्रत्येकाचे स्वागत करतो परंतु गुंडगिरी, त्रासदायक किंवा अपमानास्पद वागणुकीचे समर्थन करत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. म्हणजेच प्लॅटफॉर्मच्या कम्युनिटी गाइडलाईन्सचे उल्लंघन करणाऱ्या वापरकर्त्यांवर कारवाई केली जाईल.

तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

ट्विटरवर धर्मांध मजकूर पोस्ट करणे किंवा शेअर करणे किंवा अश्लील फोटो-व्हिडिओ शेअर करणे यासारख्या चुका केल्यास तुमचे खातेही बॅन केले जाऊ शकते. तुम्ही तुमचे मत चांगल्या मार्गाने मांडण्याऐवजी इतरांना त्रास देण्यासाठी व्यासपीठ वापरत असाल, तर तसे करणे तुम्हाला महागाच पडू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT