Twitter Bug Esakal
विज्ञान-तंत्र

Twitter Bug : डिलीट केलेले जुने ट्विट पुन्हा येतायत समोर; नवीन बगमुळे यूजर्स चिंतेत

यामुळे यूजर्सची गोपनीयता आणि डेटा खरंच सुरक्षित आहे का याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

Sudesh

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटर काही ना काही कारणास्तव कायम चर्चेत राहत आहे. आता एका बगमुळे जगभरातील ट्विटर यूजर्सची झोप उडाली आहे. कारण हा बग जुने डिलीट केलेले ट्विट्स पुन्हा समोर आणत असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत शेकडो यूजर्सनी आपल्यासोबत असं झाल्याचं म्हटलं आहे.

प्रसिद्ध ओपन सोर्स डेव्हलपर आणि सिक्युरिटी एक्सपर्ट रिचर्ड मॉरेल यांनी याबाबत माहिती दिली. मॅस्टोडॉन (Mastodon) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी आपला अनुभव शेअर केला. त्यानंतर कित्येक यूजर्सनी आपल्यासोबतही असं झाल्याचं म्हणत त्यांना दुजोरा दिला.

"गेल्या नोव्हेंबर महिन्यात मी माझे सगळे ट्विट डिलीट केले होते. यानंतर मी माझे सर्व लाईक्स, मीडिया आणि रिट्विट या सर्व गोष्टी डिलीट केल्या होत्या. माझे सुमारे ३८ हजार ट्विट मी डिलीट केले होते. यानंतर गेल्या सहा महिन्यांमध्ये मी पाच ट्विट केले होते. आज जेव्हा मी सकाळी उठलो, तेव्हा माझे ३४ हजार ट्विट्स पुन्हा एकदा ट्विटरवर दिसत होते. आता मी पुन्हा हे ट्विट्स डिलीट करत आहे." असं रिचर्डने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डिक मॉरेल या आपल्या अकाउंटवरून त्यांनी ही पोस्ट केली आहे.

Twitter Bug

या पोस्टमध्ये मॉरेल यांनी इतरांना ट्विटर (Twitter) न वापरण्याचं आवाहन देखील केलं आहे. "यावरुनच असं दिसून येतं, की तुम्ही कधीही ट्विटर वापरू नये. कृपया ही पोस्ट इतरांपर्यंत पोहोचवा. तुम्हालाही असा अनुभव आला असेल, तर कृपया तुमचा अनुभव शेअर करा. मी ट्विटरशी संपर्कात आहे." असं रिचर्ड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यानंतर आपल्याशी सुमारे ४०० लोकांनी संपर्क साधून सारखाच अनुभव शेअर केल्याचे मॉरेल यांनी सांगितले. तसेच, ट्विटरला याबाबत विचारणा केली असता यूजर्सना चक्क पूप इमोजीचा ऑटो रिप्लाय करण्यात आला. त्यामुळे यूजर्स संतापले आहेत. (Twitter bug seems to be randomly restoring deleted tweets)

बगमुळे झाल्याची शक्यता

यानंतर कित्येक तज्ज्ञांनी हे का झालं असावं याबाबत अंदाज बांधणं सुरू केलं आहे. डेटा सेंटर मायग्रेशन सुरू असताना ट्विटरच्या सर्व्हर टोपोलॉजीमधील चुकीच्या अ‍ॅडजस्टमेंटमुळे असं झालं असावं असं मत ट्विटरच्या माजी साईट रिलायबिलीटी इंजिनिअरने व्यक्त केलं.

मात्र, या सगळ्यात ट्विटर यूजर्सचा अगदी डिलीट केलेला डेटा देखील आपल्या सर्व्हरवर साठवून ठेवतं, असं दिसून येत आहे. त्यामुळे, ट्विटरवरील यूजर्सची गोपनीयता आणि डेटा खरंच सुरक्षित आहे का याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT