Twitter  Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter CEO: मस्कने २४ तासातच नवीन सीईओची केली हकालपट्टी? जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी सीईओपद सोडणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता एका महिलेने चक्क ट्विट करत आपण Twitter चे नवीन सीईओ आहोत, असा दावा केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Twitter New CEO Parody Viral Tweet: मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी सीईओपद सोडणार असल्याचे म्हटले होते. यासाठी त्यांनी पोल देखील घेतला होता. या पोलमध्ये बहुतांश यूजर्सने मस्क यांनी सीईओपद सोडावे या बाजूने मत दिले होते. या पोलनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर एका महिलेने चक्क ट्विट करत आपण Twitter चे नवीन सीईओ आहोत, असा दावा केला आहे. विशेष म्हणजे २४ तासांच्या आतच मस्क यांनी आपल्याला पदावरून काढून टाकण्यात आल्याचे देखील महिलेने म्हटले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Bess Kalb या लेखिकेने ट्विट करत मस्क यांनी आपली सीईओपदी नेमणूक केली असल्याचे म्हटले होते. महिलेने ट्विटमध्ये म्हटले की, मस्क यांचे एकमेव मित्र जेरेड कुशनर हे आहेत. मला माहितीये की आपले ज्ञान आणि दूरदृष्टीने ते एकदिवस मंगळ ग्रहावर नक्की जातील.

मस्क यांनी ट्विटर ब्लू फ्लॅगशिप इनोव्हेशनद्वारे ५६ लाख रुपयांची कमाई केली आहे. आम्ही त्यांच्या या स्मार्ट आयडियाचे कौतुक करतो. त्यांच्या या प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा. त्यांच्या आयडियाचा परिणाम काही लोकांवर नक्कीच होईल, असेही Bess Kalb म्हणाल्या. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, Bess Kalb यांनी हे ट्विट उपरोधिकपणे केले असल्याचे स्पष्ट झाले.

या ट्विटनंतर Bess Kalb यांनी आणखी एक ट्विट करत आपल्याला मस्क यांनी पदावरून हटवले असल्याचे देखील सांगितले. बेस यांचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. परंतु, त्यांनी केलेल्या या उपरोधिक ट्विटमुळे त्यांचे ट्विटर अकाउंट आता सस्पेंड होणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT