twitter ceo parag agrawal and jack dorsey welcomes elon musk on twitter compony board
twitter ceo parag agrawal and jack dorsey welcomes elon musk on twitter compony board  Sakal
विज्ञान-तंत्र

मस्कची ट्विटरमध्ये एंट्री; CEO पराग अग्रवाल अन् जॅक डोर्सी म्हणतात..

सकाळ डिजिटल टीम

टेस्ला या जगप्रसिध्द इलेक्ट्रिक कार कंपनीचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमधील 9.2% भागीदारी उघड केल्यानंतर, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी मंगळवारी कंपनी आपल्या बोर्डमध्ये अब्जाधीश एलन मस्क यांची नियुक्त करत असल्याची घोषणा केली.

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे, ते म्हणाले की "आम्ही एलन मस्कची आमच्या बोर्डावर नियुक्ती करत आहोत, हे सांगताना मला आनंद होत आहे! अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये एलनशी झालेल्या संभाषणातून, आम्हाला हे स्पष्ट झाले की तो आमच्या बोर्डाला खूप महत्त्व देईल." असे अग्रवाल यांनी ट्विट केले.

"तो एक उत्कट विश्वास ठेवणारा आणि सेवांचा परखड टीकाकार आहे, ज्याची सध्या ट्विटर आणि बोर्डरूममध्ये , आम्हाला दीर्घकालीन मजबूत बनवण्यासाठी आपल्याला नेमकी आवश्यकता आहे . एलनचे स्वागत आहे!" असे अग्रवाल यांनी फॉलो-अप ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटला मस्क यांनी काही मिनिटांतच उत्तर दिले. मस्क यांनी "येत्या काही महिन्यांत Twitter मध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी पराग आणि ट्विटर बोर्डसोबत काम करण्यास उत्सुक आहोत!" असे मस्क यांनी पोस्ट केलं.

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी देखील या संभाषणात सहभाग घेतला. "एलन ट्विटर बोर्डमध्ये सामील होत असताना मला खरोखर आनंद झाला आहे! आपल्या जगाची आणि त्यात ट्विटरच्या भूमिकेची त्याला खूप काळजी आहे. पराग आणि एलन दोघेही त्यांच्या मनाने नेतृत्व करतात आणि ते एक अविश्वसनीय टीम असतील." असे डोर्सी यांनी ट्विट केले.

दरम्यान याआधी मस्क यांनी ट्विटरवर एक पोल सुरू केला होता आणि वापरकर्त्यांना त्यांना एडिट बटण हवे आहे का ते विचारले होते. या सर्वेक्षणाला आलेल्या असंख्य रिप्लायांपैकी एक हा ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांचा होता. त्यांनी "या मतदानाचे परिणाम महत्त्वाचे असतील. कृपया काळजीपूर्वक मतदान करा," असे ट्विट केले होते.

दरम्यान एलन मस्क यांनी 2009 मध्ये वापरण्यास सुरुवात केल्यापासून त्यांचे ट्विटरवर तब्बल 80 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ते या प्लॅटफॉर्मवर खूप अॅक्टिव देखील असतात, तसेच अनेक घोषणा करण्यासाठी त्यांनी या प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. अलीकडे, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आणि त्याच्या धोरणांवर टीका देखील केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सोडून राजकारणात, ५ वेळा अटक,  बिहारमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा कसे बनले सुशील मोदी?

IPL 2024 : नाद करा पण आमचा कुठं! RCBनं विजयाचा 'पंच' मारला तरी कसा? संघाच्या हुकमी एक्क्यानेच केलाय खुलासा

Video Viral: लालू प्रसाद यांच्या मुलाने आपल्याच कार्यकर्त्याला स्टेजवरुन ढकललं खाली; व्हिडिओ होतोय व्हायरल...

Pakistan: पाकव्याप्त काश्मीरला व्हायचंय पाकिस्तानपासून वेगळं! कशामुळे झालाय स्थानिकांचा उद्रेक? जाणून घ्या

Team India Head Coach : टीम इंडिया नवीन कोचच्या शोधात; पगारापासून ते वयापर्यंत, BCCIने ठेवल्या 'या' कडक अटी

SCROLL FOR NEXT