Twitter Upcoming Features: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क सातत्याने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर नवनवीन फीचर आणत आहे. आता कंपनी लवकरच एक खास फीचर लाँच करणार आहेत. ट्विटरवर ट्विट करण्याची अक्षरमर्यादा आता वाढणार आहे. यूजर्स गेल्या अनेक महिन्यांपासून या फीचरची मागणी करत होते. आता स्वतः एलॉन मस्क यांनी या फीचरबाबत माहिती दिली आहे.
लवकरच यूजर्सला ४००० अक्षरं ट्विट करता येतील. एलॉन मस्क यांनी एका ट्विटला उत्तर याबाबतचा खुलासा केला आहे. ट्विटची अक्षरमर्यादा २८० वरून ४००० पर्यंत वाढवणार आहे का? असा एक प्रश्न ट्विटर यूजरने मस्क यांना विचारला होता. यावर मस्क यांनी होकारार्थी उत्तर दिले. परंतु, हे बदल कधीपर्यंत पाहायला मिळतील, याची माहिती त्यांनी दिली नाही.
हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
दरम्यान, या बदलावर यूजर्सकडून समिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. काही यूजर्सने हा चांगला बदल असल्याचे म्हटले आहे. तर काही यूजर्सने ट्विटरवरील ही सर्वात वाईट गोष्ट असेल, असे म्हटले आहे. याआधी ट्विटर फक्त १२० अक्षरांची मर्यादा होती. काही यूजर्सने ४००० अक्षरमर्यादा न करता, १००० अक्षरांची मर्यादा असावी, अशीही प्रतिक्रिया दिली.
दम्यान, मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter ने आपली नवीन पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस Twitter Blue ला लाँच केले आहे. यूजर्सला या सेवेचा फायदा घेण्यासाठी ८ डॉलर खर्च करावे लागतील. तर Apple iPhone यूजर्सला ११ डॉलर मोजावे लागतील. Twitter Blue पेड सबस्क्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सला खास फीचर्स वापरता येतील. यामध्ये एडिट ट्विट्स, १०८०p हाय-क्वालिटीची व्हीडिओ अपलोड करणे आणि ब्लू टिकचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.