twitter ex security chief claims company misled about bots accounts and security  
विज्ञान-तंत्र

ट्विटरवर माजी सुरक्षा प्रमुखांचे गंभीर आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ट्वीटर हे पुन्हा एकदा वादात अडकल्याचे समोर आले असून ट्विटरने वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्विटरचे माजी सुरक्षा प्रमुख पीटर जाटको यांनी व्हिसलब्लोअर म्हणून यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे. ट्विटरने वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षेसंबंधी खोटी माहिती दिल्याचा आरोप जाटको यांनी केला आहे.

सोशल मीडिया कंपनी ट्विटरवर युजर्स आणि फेडरल रेग्युलेटर्सची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, ट्विटरने लोकांच्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षेबाबत चुकीची माहिती दिली. ट्विटरचे माजी सुरक्षा प्रमुख पीटर जाटको यांनी व्हिसलब्लोअर म्हणून साक्ष देत असा दावा केला आहे की, ट्विटरने त्याच्या प्लॅटफॉर्मवर ऑटोमेटेड बॉट्सची संख्या कमी दाखवली आहे. दरम्यान जॅटको यांच्या या दाव्याचा इलॉन मस्क यांना मोठा फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे. कारण मस्क यांनी ट्विटरवर बॉट्सबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. आता ट्विटरच्या सुरक्षेशी छेडछाड झाल्याचा तसेच बॉट्ससंबंधी मागिती लपवल्याचा गंभीर आरोप ट्विटरच्या माजी सुरक्षा प्रमुखांनीच केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जॅटको यांनी केलेल्या तक्रारीत अधिकाऱ्यांना अप्रचलित सर्व्हर, कंप्युटर हल्ल्यांसाठी असुरक्षित असलेले सॉफ्टवेअर आणि हॅकिंगचे असंख्य प्रयत्न लपविण्याची मागणी करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, जाटको यांनी दावा केला आहे की ट्विटर स्पॅम आणि बॉट्सशी लढण्याऐवजी ट्विटर त्यांचा युजर बेस वाढविण्यास प्राधान्य देते.

अमेरिकेतील एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी मे महिन्यात कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अग्रवाल यांनी आरोप फेटाळून लावले, की ट्विटर स्पॅम शोधणे आणि शक्य तितके काढून टाकण्यास जोरदार प्रोत्साहन देते. तसेच अकार्यक्षम नेतृत्व आणि खराब कामगिरीमुळे जॅटको यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली. या दरम्यान CNN ने जाटकोच्या खुलाशांचा हवाला देत ट्विटरवर निष्काळजीपणा, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाहीला धोका असल्याचा आरोप केला.

ट्विटरच्या कमकुवत सुरक्षेमुळे सरकारी यंत्रणांना वापरकर्त्यांचा डेटा सहज मिळवता येईल असं त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. ट्विटरने अमेरिकन रेग्युलेटर्सची स्पॅम्स आणि बॉट्सबाबत दिशाभूल केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत ते सध्या ट्विटरमध्ये नाहीत. मार्च २०२२ मध्येच त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. लो परफॉर्मंस आणि अक्षम नेतृत्व यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे ते आता चूकीचे आरोप करत असून ट्विटरच्या सुरक्षेमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही. युजर्सचा डेटा कोणत्याही सरकारशी शेअर केला नाही असे ट्विटरचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Credit Card: SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 तारखेपासून नियम बदलणार; कोणते फायदे मिळणार नाहीत?

Latest Marathi News Updates: फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

Dada Bhuse : महायुतीचा निर्णय शिंदे घेतील; पण आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा: दादा भुसे

Pune Airport : विमानाच्या खिडकीचे आतील आवरण निघाले; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील घटना

SCROLL FOR NEXT