Twitter Rate Limit eSakal
विज्ञान-तंत्र

Twitter Rate Limit : ट्विटरवर आता पोस्ट वाचण्यालाही लिमिट; एका दिवसात किती ट्विट पाहू शकणार? जाणून घ्या

व्हेरिफाईड यूजर्स एका दिवसाला १० हजार ट्विट्स पाहू शकणार आहेत.

Sudesh

ट्विटर यूजर्सना कंपनीचे नवे मालक इलॉन मस्क यांनी मोठा धक्का दिला आहे. ट्विटरवर आता यूजर्सना एका दिवसात ठराविक पोस्टच पाहता येणार आहेत. डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टीम मॅनिप्युलेशन या गोष्टींना लढा देण्यासाठी ही लिमिट लागू केल्याचं मस्क यांनी सांगितलं आहे.

शनिवारी जगभरातील कित्येक ट्विटर यूजर्सना ट्विट करणे, फॉलो करणे किंवा नवीन ट्विट पाहणे अशा कित्येक क्रियाकलपांमध्ये अडचणी येत होत्या. तुम्ही तुमची रेट लिमीट पार केली आहे, अशा आशयाचा संदेश यूजर्सना मिळत होता. (Twitter Rate Limit)

याबाबत इलॉन मस्क यांनी स्पष्टीकरण दिले. की, आता ट्विटर यूजर्सना एका दिवसाला ठराविक पोस्टच दिसणार आहेत. मस्क यांनी एका ट्विटमध्ये असं सांगितलं आहे, की व्हेरिफाईड यूजर्स एका दिवसाला १० हजार ट्विट्स पाहू शकणार आहेत. तर, अनव्हेरिफाईड यूजर्स दिवसाला १ हजार ट्विट्स पाहू शकणार आहेत. नवीन अनव्हेरिफाईड यूजर्स हे दिवसाला ५०० ट्विट्स पाहू शकतील.

Elon Musk Tweet

शनिवारी कमी होतं लिमिट

शनिवारी इलॉन यांनी असं जाहीर केलं होतं, की ट्विटरचे व्हेरिफाईड अकाउंट असणाऱ्या व्यक्ती एका दिवसात ६,००० पोस्ट पाहू शकणार आहेत. तर, अनव्हेरिफाईड अकाउंट दिवसाला ६०० पोस्ट पाहू शकणार आहेत. अगदी नवीन अनव्हेरिफाईड अकाउंट्स दिवसाला केवळ ३०० पोस्ट पाहू शकणार आहेत.

मात्र, काही वेळानंतर आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी ही लिमिट अनुक्रमे ८०००, ८०० आणि ४०० अशी होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही लिमिट वाढवली आहे.

लॉग-इन करणं बंधनकारक

दरम्यान, इलॉन मस्कने शनिवारी आणखी एक मोठी घोषणा केली होती. यानुसार, आता ट्विटर वापरण्यासाठी यूजर्सना लॉग-इन करणं बंधनकारक असणार आहे. लॉग इन केल्याशिवाय ट्विटर ब्राऊज करणं आता शक्य होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

मोठी बातमी! हातभट्टी ज्यांच्या जमिनीवर त्या मालकावरच आता दाखल होणार गुन्हे; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचा इशारा; तलाठी, ग्रामसेवकांना पत्र

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! बस वाटेत बंद पडल्यास ‘शिवाई’तूनही करता येणार त्याच तिकीटावर प्रवास; प्रवाशाने मागितले तर तिकीटाचे पैसेही मिळतात परत

SCROLL FOR NEXT