Threads Vs Twitter  eSakal
विज्ञान-तंत्र

Threads Vs Twitter : 'स्पर्धा ठीक आहे, पण चीटिंग नाही..'; थ्रेड्स अ‍ॅपवरून मेटाला कोर्टात खेचणार इलॉन मस्क

ट्विटरने मेटावर कॉपीकॅट अ‍ॅप बनवल्याचा आरोप केला आहे.

Sudesh

ट्विटरला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामने गुरूवारी थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच केलं होतं. एकाच दिवसात या अ‍ॅपला कोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केलं. यानंतर आता ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी इन्स्टाग्रामची पॅरंट कंपनी मेटाला कोर्टात खेचण्याची धमकी दिली आहे.

ट्विटरचे वकील अ‍ॅलेक्स स्पिरो यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना एक पत्र पाठवल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. या पत्रामध्ये ट्विटरने थ्रेड्स या अ‍ॅपवरून मेटाच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

झुकरबर्गने केली कॉपी?

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅलेक्स यांनी मेटाने कॉपीकॅट अ‍ॅप बनवल्याचा आरोप केला आहे. यासाठी ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना कामावर ठेऊन, ट्विटरचे ट्रेड सीक्रेट्स आणि इंटिलेक्चुअल प्रॉपर्टीचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप यात केला आहे.

ट्विटरच्या सीईओंची टीका

ट्विटरच्या सीईओ लिंडा याक्कारिनो यांनीदेखील थ्रेड्स अ‍ॅपवर जोरदार टीका केली. ट्विटरवर लोक इतिहास उलगडण्यासाठी, किंवा रिअल-टाईम माहिती मिळवण्यासाठी येतात. या यूजर्सनी ट्विटर कम्युनिटी उभारली आहे. ही गोष्ट कधीही न बदलता येणारी आहे. ट्विटरचे अनुकरण केल्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेला आहे. मात्र, तुम्ही ट्विटरची नक्कल करू शकणार नाही, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

ट्विटर सारखंच आहे थ्रेड्स

थ्रेड्स हे अ‍ॅप गुरूवारी १०० हून अधिक देशांमध्ये लाँच करण्यात आलं. इन्स्टाग्रामचं 'टेक्स्ट व्हर्जन' म्हणून लाँच करण्यात आलेल्या या अ‍ॅपचा यूजर इंटरफेस हा बऱ्याच अंशी ट्विटरसारखाच आहे. तुम्ही आपलं इन्स्टाग्राम लॉग-इन वापरून थ्रेड्स अ‍ॅप वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT