Elon Musk Twitter eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Twitter : ट्विटरवर आता मेसेज पाठवण्यालाही लिमिट लागू, सबस्क्राईबर वाढवण्यासाठी मोठा निर्णय

ब्लू टिक नसणाऱ्या यूजर्सना आता दिवसाला ठराविक मेसेज पाठवता येणार आहेत..

Sudesh

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन सुरू करण्यापासून, ते ट्विटरवर पोस्ट पाहण्याला लिमिट लागू करण्यापर्यंत बरेच विवादित निर्णय मस्कने घेतले आहेत. यातच आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरवर आता डायरेक्ट मेसेज (DM) पाठवण्याला देखील निर्बंध लागू होणार आहेत. ब्लू टिक नसणाऱ्या यूजर्सना आता दिवसाला ठराविक मेसेज पाठवता येणार आहेत. ट्विटरने आपले व्हेरिफाईड यूजर्स वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

किती असणार लिमिट?

अनव्हेरिफाईड यूजर्सना दिवसाला किती मेसेजची लिमिट असणार आहे याबाबत ट्विटरने अद्याप माहिती दिलेली नाही. ज्यांना जास्त मेसेज पाठवायचे आहेत, त्यांनी ब्लू टिक सबस्क्रिप्शन घ्यावं असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे. (Twitter DM Limit)

मेसेजिंगमध्ये बदल

ट्विटरने यापूर्वी डायरेक्ट मेसेजच्या बाबतीत एक नवीन बदल सादर केला होता. या माध्यमातून अनव्हेरिफाईड यूजर्स अशा यूजर्सना मेसेज करू शकत नाहीत, ज्यांना ते फॉलो करत नाहीत. जर व्हेरिफाईड यूजर्सनी आपण फॉलो करत नसलेल्या यूजर्सना मेसेज केला, तर तो दुसऱ्या विशेष इनबॉक्समध्ये जातो.

या फीचरमुळे डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून होणारं स्पॅमिंग ७० टक्के कमी झाल्याचं ट्विटरने स्पष्ट केलं आहे. आता मेसेजिंगसाठी लागू करण्यात आलेल्या लिमिटमुळे हे प्रमाण आणखी कमी होणार असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT