Upcoming Bikes esakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Bikes : होंडा पासून बजाजपर्यंत, या महिन्यात लाँच होणार एकसो एक बाइक्स

या महिन्यात अनेक कंपन्या त्यांच्या बाईक सिरीजचे नवीन मॉडेल्स लॉन्च करणार

सकाळ डिजिटल टीम

Upcoming Bikes : जर तुम्ही स्वतःसाठी नवी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट बघा.. कारण या महिन्यात अनेक कंपन्या त्यांच्या बाईक सिरीजचे नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहेत. पण या बाईक्स कोणत्या आहेत याची माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल.

होंडा 100cc बाइक्स

15 मार्च 2023 रोजी होंडा आपली नवीन 100 सीसी मोटरसायकल लॉन्च करणार आहे. आत्तापर्यंत, या बाईकशी संबंधित अधिक माहिती समोर आलेली नाही. पण असं म्हटलं जातंय की ही नवी बाईक लॉन्च झाल्यानंतर ती HF Deluxe आणि Bajaj Platina आणि Hero Splendor ला टक्कर देईल.

बजाज पल्सर 220F

बजाज ऑटो लवकरच आपली नवी बजाज पल्सर बाईक ग्राहकांसाठी लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या बाईकचे बुकिंग निवडक डीलर्ससाठी सुरू झालंय. RDE उत्सर्जन मानदंड लक्षात घेऊन ही बाइक लॉन्च केली जाईल.

ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आर

15 मार्च 2023 रोजी ट्रायम्फ मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी त्यांची नवी बाइक लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होईल. नवीन Street Triple 765 मध्ये 765cc इनलाइन थ्री सिलेंडर इंजिन मिळू शकते जे 128bhp पॉवर आणि 80Nm टॉर्क जनरेट करेल.

TVS iQube ST

TVS Motor ने त्यांच्या ग्राहकांसाठी गेल्या वर्षी मार्चमध्ये iQube इलेक्ट्रिक स्कूटर सिरीज लॉन्च केली होती, पण त्यांनी या iQube ST च्या टॉप व्हेरिएंटची किंमत जाहीर केलेली नव्हती. आता कंपनी या महिन्यात ग्राहकांसाठी हेच टॉप मॉडेल लॉन्च करू शकते. ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचं झालं तर ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 145 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT