Upcoming Cars in May 2023 Sakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Cars in May 2023 : Tata Altroz ​​iCNG ते Jimny पर्यंत या गाड्या होणार लॉन्च

सकाळ डिजिटल टीम

Car launch : दर महिन्याला नवीन गाड्या लाँच होत आहेत आणि आता पुढील महिन्यातही अनेक नवीन कार बाजारात दाखल होणार आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या पुढील महिन्यात कोणत्या गाड्या लॉन्च होणार आहेत.

Fronx नंतर मारुती सुझुकीची Jimny आता पहिल्या क्रमांकावर आहे. ऑटो एक्सपो 2023 मध्ये अनावरण केल्यानंतर मारुतीने ग्राहकांसाठी या कारचे बुकिंग सुरू केले होते. कंपनीला या कारसाठी आतापर्यंत 30 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. फ्रॉन्क्सनंतर आता ही कार पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Tata Altroz ​​iCNG

टाटा मोटर्सने अल्ट्रोज सीएनजी मॉडेलची घोषणा केली आहे आणि या कारचे डिझाइन आणि वैशिष्ट्यांचे अनावरण केले आहे, परंतु आता ही कार ग्राहकांसाठी पुढील महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते.

कंपनीने काही काळापूर्वी Altroz ​​iCNG चे बुकिंग सुरु केले होते, ही कार बुकींग रक्कम 21,000 रुपये भरून बुक करता येते. या कारची किंमत अजून समोर आलेली नाही, मात्र येत्या काही आठवड्यांमध्ये याचे अधिकृत लॉन्चिंग होणार आहे. त्यावेळी या कारची किंमतही कळेल. ही कार देखील पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

याशिवाय पुढील महिन्यात Hyundai आणि Kia देखील त्यांचे नवीन मॉडेल लॉन्च करू शकतात. Kia आपल्या Seltos चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च करू शकते. दुसरीकडे, Hyundai ने अलीकडेच त्याच्या SUV Exter चा लुक रिव्हील केला आहे, जो पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

कंपनीची सब-कॉम्पॅक्ट SUV Exter आकाराने लहान असेल. ह्युंदाईच्या या आगामी एसयूव्ही कारच्या लॉन्चनंतर ती मारुती सुझुकीच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या फ्रॉन्क्सला टक्कर देऊ शकते, असं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT