Upcoming SUV Cars 2022
Upcoming SUV Cars 2022 
विज्ञान-तंत्र

Upcoming Cars 2022 : नव्या वर्षात लॉंच होणार 'या' दमदार SUV

सकाळ डिजिटल टीम

Upcoming SUV Cars 2022 : 2022 मध्ये वाहन अनेक दमदार कार लॉन्च होणार आहेत. जर तुम्ही पुढच्या महिन्यापर्यंत चांगली SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 2021 हे वर्ष काही दिवसात संपणार आहे. वाहन उद्योगही नवीन वर्षाच्या तयारीला लागला आहे. बऱ्याच कंपन्या त्यांच्या काही सर्वोत्तम SUV लाँच करणार आहेत, ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

1) महिंद्रा स्कॉर्पिओ आणि एक्सयूव्ही 700 (mahindra scorpio and xuv 700)

या यादीमध्ये पहिली कार आहे महिंद्रा. महिंद्रा 2022 मध्ये बाजारात आपल्या दोन SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. महिंद्राच्या नवीन XUV700 आणि नवीन Scorpio 2022 त्यांच्या इतर सर्व SUV शी स्पर्धा करेल, कारण Scorpio च्या जुन्या मॉडेलला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. काही देशांमध्ये ही गाडी आधीच लॉन्च करण्यात आली आहे. आता ही स्कॉर्पिओ भारतात लॉन्च होणार आहे. 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ नवीन लॅडर-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन स्कॉर्पिओची विक्री मार्चपूर्वी सुरू होईल, असे मानले जात आहे. स्कॉर्पिओ 2022 मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची अंदाजे सुरुवात 10 लाख रुपये असू शकते. त्याच वेळी, XUV700 ची अंदाजे सुरुवातीची किंमत 12.49 लाख रुपये असू शकते.

2) मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza)

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जपानी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची नवीन सब SUV Vitara Brezza आहे. कंपनी पुढील वर्षी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनीची पहिली SUV असेल, ज्यामध्ये कंपनीने इलेक्ट्रिक सनरूफ दिले आहे. याशिवाय कंपनीने पॅडल शिफ्टर, फॅक्टरी फिट सीएनजी किट, 104 पीएस 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. ही कार तिच्या आधीच्या मॉडेलपेक्षा किंचित लांब आहे. त्याची अंदाजे सुरुवातीची किंमत 11.50 लाख रुपये असू शकते.

3) टोयोटा हायलक्स (Toyota Hilux)

आता टोयोटा लाइफस्टाइल व्हेकल Hilux लाँच करण्यासाठी सज्ज आहे. ही SUV 2022 च्या सुरुवातीलाच लॉन्च केली जाऊ शकते. स्कोडा कोडियाकशी स्पर्धा करण्यासाठी टोयोटाकडे आधीच फॉर्च्युनर आहे. याआधी ही SUV भारतात अनेक वेळा पाहण्यात आली आहे. जानेवारी 2022 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. टोयोटा Hilux IMV-II प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यात 2.8-लिटर डिझेल इंजिन मिळू शकते. त्याची अंदाजे सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये आहे.

4) स्कोडा कोडियाक (Skoda Kodiaq)

Skoda ने एप्रिल 2020 पासून भारतात कोडियाकची विक्री थांबवली आहे. पण आता 2022 मध्ये Skoda आपली SUV Kodiaq चे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. 2022 कोडियाकच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. कारला अतिशय आकर्षक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Skoda चे नवीन अपडेट Kodiaq 2022 पुढील वर्षी जानेवारीमध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यात लॉन्च केले जाऊ शकते. 7 सीटर एसयूव्हीला बोनेट, ग्रिल, बंपर, हेडलाइट्स आणि मागील दिवे यांच्या डिझाइनमध्ये बदल करून सुंदर लुक देण्यात आला आहे. त्याची अंदाजे सुरुवातीची किंमत 35 लाख रुपये आहे.

5 ऑडी क्यू 7 (Audi Q7)

ऑडीने 2020 च्या सुरुवातीला BS-IV स्टॅंडर्स मॉडेल बंद केले आहे. Audi पुन्हा एकदा जानेवारी 2022 मध्ये हे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करू शकते. आता SUV सर्वसमावेशक फेसलिफ्ट आणि पेट्रोल ड्रायव्हट्रेनसह पुनरागमन करत आहे. SUV भारतात कंप्लिटली नॉक्ड डाउन (CKD) युनिट म्हणून येते. याचे उत्‍पादन औरंगाबाद येथील Skoda Auto Volkswagen India Private Limited (SAVWIPL)च्‍या उत्पादन केंद्रात केले जाईल. त्याची अंदाजे किंमत 75 लाख रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाने दारू प्यायलेला पब करण्यात आला सील; मालकासह मॅनेजरला ४ दिवसांची कोठडी

KKR vs SRH Qualifier 1 Live : केकेआर - हैदराबाद सामन्यात पाऊस करणार खेळ खराब; काय आहे हवामानाचा अंदाज?

Naga Chaitanya: नागा चैतन्य खरेदी केली नवीकोरी पोर्शे; किंमत वाचून डोळे विस्फारतील

Prashant Kishor: लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होणार? मोदींच्या हॅट्रिकबद्दल प्रशांत किशोर यांची मोठं भाकित

SCROLL FOR NEXT