upcoming smartphone in India from Samsung xiaomi oppo realme and vivo in February 2022 check details
upcoming smartphone in India from Samsung xiaomi oppo realme and vivo in February 2022 check details  Google
विज्ञान-तंत्र

देशात या महिन्यात लॉन्च होणार हे 10 स्मार्टफोन, मिळेल दमदार कॅमेरा

सकाळ डिजिटल टीम

जानेवारीत काही दमदार फोन लॉंच झाल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात देखील अनेक दमदार फोन लॉंच होणार आहेत. Oppo ने फेब्रुवारी 2022 ची सुरुवात त्यांच्या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोनसह केली आहे. या महिन्यातही अनेक फोन भारतीय बाजारात लॉन्च होणार आहेत. या यादीमध्ये Samsung ते Xiaomi, Realme आणि Vivo या फोनचा समावेश आहे. Samsung चा Galaxy Unpacked इव्हेंट देखील याच महिन्यात होणार आहे. चला तर मग या महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च होणार्‍या फोनची यादी पाहूया.

Oppo ने नुकतेच भारतीय बाजारात Oppo Reno 7 5G आणि Reno 7 Pro 5G लॉन्च केले आहेत. Reno 7 5G आणि Reno 7 Pro 5G हे दोन्ही फोन पहिल्यांदा चीनमध्ये गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते, जरी फोनचे भारतीय व्हेरिएंट वेगवेगळ्या फीचर्ससह सादर केले गेले आहेत. Oppo Reno 7 5G भारतीय बाजारपेठेत Mi 11X, Realme GT Master Edition आणि OnePlus Nord 2 शी स्पर्धा करेल. त्याच वेळी, Oppo Reno 7 Pro 5G या फोनची सॅमसंग 20 FE 5G, Mi 11i हायपरचार्ज आणि Realme GT सारख्या फोनशी स्पर्धा असेल.

Redmi Note 11 चे लॉन्चिंग 9 फेब्रुवारीला होणार आहे. स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप या फोनमध्ये 6.43-इंचाच्या AMOLED डिस्प्ले आढळू शकतो, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल असेल. याशिवाय, भारतात Redmi Note 11S लाँच कंफर्म झाले आहे. Redmi Note 11S चे लॉन्च देखील भारतात 9 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. यात 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल.

Realme 9 सीरीज 16 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च होणार आहे. या मध्ये Realme 9 Pro + आणि Realme 9 Pro लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. फोन MediaTek Dimension 920 प्रोसेसरसह सादर केला जाईल. इन-बिल्ट हार्ट रेट सेन्सर Realme 9 Pro + सह देखील उपलब्ध असेल.

Vivo 1T 5G हा Vivo Series T अंतर्गत लाँच होणारा पहिला फोन असेल. Vivo 1T 5G चे लॉन्च देखील भारतात फक्त 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. Vivo 1T 5G बद्दल असा दावा केला जात आहे की त्याच्या किंमतीत हा सर्वात स्वस्त आणि स्लीम 5G फोन असेल. Vivo 1T 5G ची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

Samsung Galaxy S22 सीरीज Samsung Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आहे. Samsung Galaxy S22 Exynos 2200 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह देऊ शकतो. या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S22+ आणि Samsung Galaxy S22 Ultra देखील सादर केले जातील. Galaxy Unpacked इव्हेंट 2022 हा इव्हेंट 9 फेब्रुवारी रोजी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT