UPI  sakal
विज्ञान-तंत्र

UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? मग पाच गोष्टी लक्षात ठेवा

​UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

Aishwarya Musale

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आज केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये वापरला जात आहे. UPI ची सुरुवात भारतातून झाली असली तरी हळूहळू संपूर्ण जग त्याचा स्वीकार करत आहे. UPI सर्वांपर्यंत पोहोचला आहे, पण त्यात अनेक समस्या आहेत. पहिली समस्या म्हणजे पेमेंट अडकणे. अनेकवेळा बँकेचे सर्व्हर डाउन असल्याने तर कधी इंटरनेटमुळे पेमेंट अडकून पडते. आज आम्ही तुम्हाला UPI पेमेंटमधील काही समस्या आणि त्यांच्या उपायांबद्दल सांगणार आहोत.

UPI पेमेंट लिमिट चेक करा

UPI पेमेंट फेल होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे UPI पेमेंट लिमिट पूर्ण होणे हे आहे. हे दोन्ही बाजूंनी होऊ शकते. म्हणजेच जर तुमची पेमेंट मर्यादा देखील पूर्ण झाली असेल तर पेमेंट थांबवले जाऊ शकते.

बँक सर्व्हर इश्यू

UPI पेमेंट फेल होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे बँक सर्व्हर इश्यू. कोणत्याही बँकेचा सर्व्हर कधीही निकामी होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी, तुमच्या UPI आयडीशी एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करून ठेवा. पेमेंट करताना काही अडचण आल्यास, तुम्ही बँक अकाऊंट बदलून लगेच पेमेंट करू शकता.

UPI पिन

तुम्ही UPI पिन चुकीचा टाकल्यास, पेमेंट अडकू शकते किंवा फेल होऊ शकते. अशा परिस्थितीत पिनचीही काळजी घ्या. तुम्ही पिन विसरला असल्यास, तो रीसेट करा.

इंटरनेट कनेक्शन

UPI पेमेंटसाठी इंटरनेट कनेक्शन खूप महत्वाचे आहे. इंटरनेट कनेक्शनमध्ये काही समस्या असल्यास तुमचे पेमेंट थांबू शकते. फोनमध्ये सिग्नल कमी असल्यास पेमेंट करू नका किंवा कोणाकडून हॉटस्पॉट घेऊन पेमेंट करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT