RadioGPT eSakal
विज्ञान-तंत्र

RadioGPT : आता डीजेचं कामही करणार एआय; अमेरिकेतील रेडिओ स्टेशनमध्ये सेवा सुरू

अल्फा मीडियाच्या KBFF 95.5 FM या रेडिओने हा प्रयोग केला आहे.

Sudesh

सध्या सगळीकडे एआयचा बोलबाला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विविध कामांमध्ये माणसांची जागा घेत आहेत. आता चक्क डीजेचं (AI DJ) कामही एआय करत असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील एका रेडिओ स्टेशनने हा फुल-टाईम एआय-डीजे लाँच केला आहे.

अल्फा मीडियाच्या KBFF 95.5 FM या रेडिओने फ्युच्युरी मीडियाने बनवलेल्या रेडिओजीपीटी (RadioGPT) सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी अ‍ॅशले एलझिंगा या आपल्या होस्टचं एआय रुप तयार करून घेतलं आहे. आता हे एआय रूपच शो चालवत आहे.

रेडिओ स्टेशनची निर्मिती क्षमता वाढवणे आणि प्रेक्षकांना वेळेवर आणि सर्वसमावेशक माहिती प्रदान करणे, या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचललं आहे. अल्फा मीडियाचे कंटेंट EVP फिल बेकर यांनी ही माहिती दिली. रेडिओ ब्रॉडकास्टिंग सेवेतील एआयच्या क्षमतांबद्दल त्यांनी उत्साह व्यक्त केला. एआयच्या वापरामुळे स्टेशन पूर्वीपेक्षा अधिक लवचिक होऊ शकते. यासोबतच, कंटेंट क्रिएटर्सना वेगळ्या गोष्टींवर काम करण्यास मदत होते असं मत फिल यांनी व्यक्त केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅशलेचं हे एआय व्हर्जन तिच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतं. तसंच, श्रोत्यांशी संवाद साधताना अगदी खऱ्या अ‍ॅशलेप्रमाणेच गप्पा मारतं. या एआयचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये एआय अ‍ॅशले जोक सांगताना दिलतेय, तर दुसऱ्या व्हिडिओत ती एका लकी यूजरला टेलर स्विफ्टच्या कॉन्सर्टची तिकिटे मिळाल्याचं सांगत आहे.

खऱ्या डीजेची नोकरी धोक्यात?

अल्फा मीडियाने हे स्पष्ट केलं आहे, की यामुळे खऱ्या अ‍ॅशलेची नोकरी धोक्यात येणार नाही. अ‍ॅशलेची नोकरी कायम राहणार असून, तिला नेहमीप्रमाणेच पगार मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT