Google Drive Missing Files eSakal
विज्ञान-तंत्र

Google Drive : गुगल ड्राईव्हमधून आपोआप डिलीट होतोय डेटा; कंपनीने दिला यूजर्सना इशारा

Google Data Missing : गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेला डेटा गायब होत असल्याची तक्रार कित्येक यूजर्सनी केली आहे.

Sudesh

Google Drive Missing Files : आपल्यापैकी कित्येक जण गुगलचा वापर करतात. डेटा बॅकअप करण्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापरही बरेच लोक करत असतात. मात्र आता गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेला डेटा गायब होत असल्याची तक्रार कित्येक यूजर्सनी केली आहे. यानंतर कंपनीने इतर यूजर्सना एक इशारा दिला आहे.

गुगलने स्पष्ट केलं आहे, की काही यूजर्ससोबत ड्राईव्हवरील डेटा गायब होण्याची घटना घडली आहे. 84.0.0.0 ते 84.0.4.0 यापैकी एक व्हर्जन वापरणाऱ्या यूजर्सना ही समस्या जाणवत असल्याचं समोर आलं आहे.

कित्येक महिन्यांचा डेटा गायब

एका यूजरने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे, की त्याचा मे महिन्यापासून आतापर्यंत गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतलेला सर्व डेटा गायब झाला आहे. त्याने गुगल सपोर्ट टीमच्या मदतीने डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. गुगल कम्युनिटी सपोर्टवर अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी आल्या आहेत.

कंपनीचा इशारा

दरम्यान, गुगल ड्राईव्ह टीमने डेस्कटॉप यूजर्सना एक इशारा दिला आहे. डेटा रिकव्हर करण्यासाठी तसंच हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तेव्हा, यूजर्सनी आपल्या बाजूने कोणतीही प्रक्रिया करू नये, तसंच चुकूनही डिस्कनेक्ट अकाउंट या पर्यायावर क्लिक करू नये असं गुगलने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT