Jio esakal
विज्ञान-तंत्र

Jio युजर्सना धक्का! 1 रुपयाच्या प्रीपेड प्लॅनवर कंपनीचा यू-टर्न

Jio युजर्सना मोठा धक्का! 1 रुपयाच्या प्रीपेड प्लॅनवर कंपनीचा यू-टर्न

सकाळ वृत्तसेवा

रिलायन्स जिओने यूजर्सला मोठा झटका दिला आहे.

रिलायन्स जिओने (Reliance Jio) यूजर्सला मोठा झटका दिला आहे. कंपनीने 15 डिसेंबर रोजी आपला सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) लॉंच केला. 1 रुपयाच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता आणि 100MB डेटा दिला जात होता. तथापि, प्लॅन लॉंच झाल्यानंतर एकाच दिवसानंतर, जिओने त्यात एक मोठा बदल केला आहे, ज्यामुळे यूजर्सना धक्का बसला आहे. कंपनीने आपल्या एक रुपयाच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांमध्ये जोरदार कपात केली आहे. Telecom Talk च्या रिपोर्टनुसार, Jio चा हा प्लॅन आता फक्त 1 दिवसाची वैधता आणि 10MB डेटा देत आहे. (Users upset over Jio's U-turn on Rs 1 prepaid plan)

जिओचा हा प्लॅन My Jio App मध्ये दिलेल्या 4G डेटा व्हाउचर विभागात दिलेल्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये सूचीबद्ध आहे. व्हॅल्यू कॅटेगरीच्या खाली दिलेल्या मूल्य श्रेणीतील 'Other Plans' वर जाऊन हे पाहू शकता. App मध्ये या प्लॅनचे वर्णन 'ट्रेनिंग प्लॅन' असे करण्यात आले आहे. काल हा प्लॅन युजर्सना 30 दिवसांची वैधता आणि 100MB डेटा देत होता, पण आता हा प्लॅन सबस्क्राय केल्यानंतर तुम्हाला फक्त 1 दिवसाची वैधता आणि 10MB डेटाच मिळेल.

15 रुपयांचा डेटा व्हाउचर हा एक चांगला पर्याय

वापरकर्त्यांना Jio 15 रुपयांचे 4G डेटा व्हाउचर ऑफर करते. या डेटा व्हाउचरमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी 1GB हाय-स्पीड डेटा ऑफर करते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला स्वस्त डेटा प्लॅनची आवश्‍यकता असेल, तर 15 रुपयांचा पॅक तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल; कारण 1 रुपयाच्या प्लॅनमध्ये 10 वेळा रिचार्ज केल्यानंतरही तुम्हाला फक्त 100MB डेटा मिळेल.

Airtel आणि Vodafone कडे नाहीत इतके स्वस्त डेटा पॅक

जिओ आपल्या वापरकर्त्यांना सर्वात स्वस्त डेटा पॅक ऑफर करत आहे. एअरटेलबद्दल (Airtel) बोलायचे झाले तर कंपनीच्या वेबसाइटनुसार, एअरटेल आपल्या यूजर्सना 58 रुपये देत असलेला सर्वात स्वस्त डेटा पॅक आहे. या पॅकमध्ये कंपनी 3 GB डेटा ऑफर करते आणि त्याची वैधता चालू असलेल्या प्लॅनसारखीच राहते. जर Vodafone-Idea बद्दल बोलायचे झाल्यास कंपनी 19 रुपयांचे डेटा व्हाउचर देते. यामध्ये 24 तासांच्या वैधतेसह 1 GB डेटा ऑफर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT