apple product sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : ‘ॲपल’चा खजिना

ॲपलने वर्ल्डवाइड डेव्लपर कॉन्फरन्सची घोषणा केल्यानंतर कंपनी कोणते नवे प्रोडक्ट्स लॉन्च करणार याची उत्सुकता चाहत्यांना होती.

सकाळ वृत्तसेवा

- वैभव गाटे

ॲपलने वर्ल्डवाइड डेव्लपर कॉन्फरन्सची घोषणा केल्यानंतर कंपनी कोणते नवे प्रोडक्ट्स लॉन्च करणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. नुकत्याच झालेल्या या कॉन्फरन्समध्ये कंपनीने आपल्या खजिन्यातून ॲपल व्हिजन प्रो, मॅकबुक एअर, वॉच ओएस १०, ओएस १७ असे प्रोडक्ट्स आणि सेवा युजर्ससाठी आणल्या आहेत. काय आहे या ॲपल प्रोडक्ट्स आणि सेवांची खासियत, आपण जाणून घेऊयात...

१. ॲपल व्हिजन प्रो

ॲपलचा हा एआर हेडसेड व्हर्चुअल रिॲलिटीच्या दुनियेत गेमचेंजर ठरणार आहे. या एआर सेटचा वापर युजर्स मनोरंजनासह, कामासाठीही करू शकणार आहेत. या एआरची खासियत म्हणजे तो युजर्सच्या इशाऱ्यावर कंट्रोल होतो, त्याला कोणत्याही फिजिकल कंट्रोलची गरज नाही.

स्पेसिफिकेशन

चिपसेट : एम २

ओएस : व्हिजनओएस

सिक्युरिटी : ऑप्टिक आयडी

नवीन ॲप स्टोअर

किंमत : २.८८ लाख रुपये

विक्री : पुढील वर्षी अमेरिकेत, त्यानंतर अन्य देशात

२. मॅकबुक एअर

एम २ चिपसेट अशी या मॅकबुक एअरची खासियत आहे. ज्यात मॅगसेफ चार्जिंग, दोन थंंडरबोल्ट पोर्ट आणि ६के एक्सटर्नल डिस्प्ले असे फिचर्स देण्यात आले आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर हा मॅकबुक १८ तास सुरू राहिल, असा कंपनीचा दावा आहे.

स्पेसिफिकेशन

चिपसेट : एम २

स्क्रीन : १५.३ इंच, लिक्विड रेटिना डिस्प्ले

कॅमेरा : १०८० पिक्सल

स्पिकर :

बॅटरी : १८ तास

किंमत : १ लाख सात हजार रुपये

३. वॉच ओएस १०

आयफोनमध्ये विजेट वर्क करतात, त्याचप्रमाणे नव्या वॉच ओएस १० मध्ये विजेट वर्क करतील. यात दोन नवे वॉचफेस पाहायला मिळतील. हेल्थ, फिटनेस आणि पर्सनलाइजेशनवर वॉच ओएस १० अधिक लक्ष देईल.

४. आयओएस १७

आयओएस १७ कधी येणार याची युजर्सला अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. हा नवा ओएस युजर्सला नवा फील देणार आहे.

  • आयमेसेजवर आता युजर्स फोटोद्वारे स्टिकर तयार करू शकतील.

  • एअर ड्रॉपबरोबर युजर्सला आता नेमड्रॉप फिचरही मिळेल. याद्वारे युजर्स कॉन्टेक्ट पोस्टरसोबत कॉन्टेक्ट डिटेलही शेअर करू शकतील.

  • की-बोर्डमध्ये ऑटो करेक्शनसाठी जनरेटिव्ह एआयचा वापर

  • कमांड देण्यासाठी ‘हे... सिरी’ बोलण्याची गरज नाही, केवळ ‘सिरी’ म्हणून कमांड देता येणार. ॲपल मॅपमध्ये ऑफलाइन मोडचा वापर करता येणार

याशिवाय ॲपलने एम २ एल्ट्रा चिप आणि मॅक स्टुडिओही लॉन्च केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

Women’s World Cup 2025: 'शेफाली वर्माला महिला संघातून वगळले'; विश्‍वकरंडकासाठी भारताचा संघ जाहीर, रेणुका सिंगचा समावेश

Mata Lakshmi: माता लक्ष्मी रात्री 'या' ठिकाणी करते भ्रमण, वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT