नवी दिल्ली - अलिकडे लहान मुलांपासून प्रोैढांपर्यंत अनेक जण गेम खेळण्यास पसंती देत आहेत. यामध्ये पब्जीने जास्त लोकप्रियता मिळविली आहे. परंतु, नुकतीच एक नवीन गेम बाजारात आली आहे. ही गेम पब्जीसारखीच लोकप्रियता मिळवत आहे. Valheim असे या नव्या गेमचे नाव आहे. दोन फेब्रुवारी रोजी अर्ली अॅक्सेसच्या स्वरूपात सुरू झालेल्या या गेमच्या सोळा दिवसात तब्बल तीस लाखांपेक्षा जास्त काॅपी विकल्या आहेत.
Valheim ही गेम फक्त पीसीवरच उपलब्ध झाले. गेम रिलिज झाल्यानंतर सतरा दिसांत सिस्टीमवर पाच लाख ग्राहक मिळविले आहेत. SteamDB ने दिलेल्या माहितीनुसार १९ फ्रेब्रुवारी रोजी या गेमने GTA V आणि Postal या दोन्ही गेमला मागे टाकले आणि स्टीममध्ये सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या गेममध्ये नवव्या स्थानावर झेप घेतली. मिळालेल्या माहितीनुसार Among Us, Life is Strange 2, Fallout 4 आणि Terraria या गेमलाही मागे टाकत Valheim पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.
SteamDB ने सांगितल्यानुसार Valheim स्टीमवर सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या गेममध्ये पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. अर्ली एक्सप्रेसवर असूनही तीन आठवड्याच्या कमी वेळेतही जास्त लोप्रियता मिळविली आहे.
वाईकिंग थीम असणाऱ्या Valheim ने सोळा दिवसांती तीस लाख काॅपी विकल्या आहेत. गेल्या आठवड्यात गेमला साठ हजार पेक्षा जास्त सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याबरोबरच Valheim ही गेम Steam च्या टाॅप २५० उतकृष्ट रिव्यूड मेममध्ये सहभागी झाली आहे.
रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात गेमच्या तब्बल वीस लाख काॅपी विकल्या होत्या. आॅनलाईन पीसी गेम Steam च्या माध्यमातून ही गेम ५२९ रूपयांना खरेदी करता येते. Valheim ला स्वतंत्र स्वीडिश गेम डेव्हलपर आयरन गेट एबीने (Iron Gate AB) डिझाइन केली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.