VI esakal
विज्ञान-तंत्र

Vi युजर्सची चांदी! मिळतोय मोफत बंपर डेटा; जिओ-एअरटेलची वाढली डोकेदुखी

Vi युजर्सची चांदी! मिळतोय मोफत बंपर डेटा; जिओ-एअरटेलची वाढली डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांच्यात सतत स्पर्धा असते.

रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) यांच्यात सतत स्पर्धा (Competition) असते. या तिन्ही कंपन्या विविध ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. जिओचा दावा आहे की सर्वात स्वस्त प्लॅन्स त्यांच्याकडेच आहेत. व्होडाफोन-आयडिया प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांच्या बाबतीत फक्त एअरटेलच नव्हे तर जिओपेक्षा खूप पुढे आहे. Vi च्या प्लॅनमध्ये अशा तीन सुविधा दिल्या जात आहेत, ज्याद्वारे युजर्सना अनलिमिटेड मोफत डेटा (Data) सुविधा मिळते. Jio किंवा Airtel कडे या सुविधा नाहीत.

1. वीकेंड डेटा रोलओव्हर (Weekend Data Rollover) : कंपनी व्होडाफोन-आयडिया युजर्सना वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा प्रदान करते. यामध्ये ग्राहकांना आठवड्यातील उर्वरित डेटा शनिवार आणि रविवारी वापरण्याची सुविधा मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या पॅकमध्ये दररोज 1.5 GB डेटा मिळत असेल, परंतु तुम्ही दररोज फक्त 1 GB डेटा वापरत असाल. त्यामुळे सोमवार ते शुक्रवारपर्यंत एकूण 2.5 जीबी डेटा जमा होणार आहे, जे तुम्ही वीकेंडला वापरू शकता.

2. बींज ऑल नाईट (Binge All Night) : बींज ऑल नाईट सुविधेअंतर्गत ग्राहकांना रात्री अमर्यादित डेटा वापरण्याची सुविधा मिळते. रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत तुम्हाला हवे तेवढे इंटरनेट वापरू शकता. विशेष म्हणजे हा डेटा तुमच्या रोजच्या पॅकमधून कापला जाणार नाही.

3. डेटा डिलाइट (Data delight) : डेटा डिलाइट अंतर्गत युजर्सना दरमहा 2 GB चा अतिरिक्त बॅक-अप डेटा दिला जातो. हे एक विनामूल्य वैशिष्ट्य आहे, जे युजर्सना सक्रिय करावे लागेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना Vi ऍपमध्ये लॉग इन करावे लागेल किंवा 121249 डायल करावे लागेल. ही कंपनीची नवीन सुविधा आहे. उर्वरित दोन सुविधा फार पूर्वीपासून दिल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT