Anti-Mosquito Air Defense Machine eSakal
विज्ञान-तंत्र

Viral Video : 'आयर्न डोम' सारखी टेक्नॉलॉजी वापरुन तयार केली चक्क मच्छर मारायची मशीन; इंजिनियरचा दावा! पाहा व्हिडिओ

Iron Dome for Mosquito : या मशीनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Sudesh

Anti-Mosquito Air Defense Machine : डास हा कीटक शक्यतो कुणालाच आवडत नाही. कधीही येऊन चावणारे, कानापाशी गुणगुण करून डोकं उठवणारे मच्छर मारण्यासाठी आपण कित्येक उपाय करून पाहतो. कॉईल लावणे, धूप लावणे किंवा मग केमिकल्स असलेले मशीन वापरणे असे कित्येक पर्याय आपण वापरतो. मात्र एका इंजिनियरने डासांच्या समस्येवर वेगळाच उपाय शोधला आहे.

चीनमधील एका इंजिनियरने चक्क मच्छर मारण्यासाठी एक छोटीशी एअर डिफेन्स सिस्टीम तयार केली आहे. इस्राइलची आयर्न डोम सिस्टीम ज्याप्रमाणे हवेतून येणाऱ्या मिसाईल आणि छोट्या विमानांना टार्गेट करते, त्याप्रमाणेच ही सिस्टीम आजूबाजूला उडणाऱ्या डासांना लक्ष्य करत असल्याचा दावा या इंजिनियरने केला आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल

या मशीनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग नावाच्या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय, की ही मशीन कशा प्रकारे लेझरने डासांना मारत आहे. ज्याने हा व्हिडिओ बनवला आहे, त्याने चक्क मेलेल्या डासांना एका डायरीमध्ये चिटकवून त्यांचा रेकॉर्ड देखील ठेवला आहे.

सत्यतेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, कित्येक एक्स यूजर्स या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या मशीनमधील सेन्सरचे रिझॉल्यूशन हे डासांना डिटेक्ट करण्यासाठी पुरेसे नसल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. तर, त्यातील लेझर देखील मच्छरांना मारण्याएवढी स्ट्राँग किंवा फास्ट नसल्याचंही यूजर्स म्हणत आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

यासोबतच कित्येक नेटिझन्सनी या मशीनचं कौतुक केलं आहे. अशी मशीन खरोखरच असेल, तर ती चीनची असूनही मी खरेदी करेल; असं एका यूजरने म्हटलं आहे. तर या लेझरमुळे माणसांना तर काही धोका नाही ना? असे प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT