vikram lander left only next four days 
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 2 : 'विक्रम'कडे उरले अवघे चार दिवस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाची महत्वाकांक्षी अवकाश मोहीम 'चांद्रयान-२' इस्रोच्या वैज्ञानिकांच्या तांत्रिक कौशल्याची परीक्षा घेणारी ठरत आहे. ७ सप्टेंबरच्या भल्या पहाटे चांद्रयानाचे लँडर 'विक्रम' चांद्रभूमीवर उतरत असताना अवघ्या २.१ किमी उंचीवरून त्याचा संपर्क तुटला. आजतागायत त्याच्याशी कोणताही संपर्क प्रस्थापित करण्यात विज्ञानिकांना यश आले नाही. आता फक्त पुढील चार दिवसातच संपर्क झाला तरच लँडर विक्रमद्वारे वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवणे शक्य होणार आहे.

चांद्रभूमीवर चौदा दिवस उजेड आणि तेवढ्याच दिवसाची रात्र. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर येत्या २१ सप्टेंबरला अंधार पडणार आहे. त्यामुळे तिथे पुढील १४ दिवस रात्र असणार आहे. चंद्रावर उजेड असताना दक्षिण ध्रुवावरील तापमान १२० डिग्री सेल्सियस असते आणि अंधार पडल्यावर तेच तापमान क्षणार्धात उणे २३२ डिग्री सेल्सियस पर्यंत जाते. अशा तापमानात कोणतेही संयंत्र काम करणे शक्य नाही. त्यामुळे पुढील चार दिवसानंतर 'विक्रम' मृतप्राय होईल.

चांद्रयान-२ मधून काय साध्य झाले
- भुस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान अर्थात 'GSLV Mark - 3' ची यशस्वी चाचणी झाली. सुमारे ४ टन वजनाचा उपग्रह ३५ हजार किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान प्राप्त.
- चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याची यशस्वी चाचणी.
- मात्र चांद्रभूमीवर अलगदपणे लँडर उतरवण्यात अपयश.
- चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरच्या माध्यमातून दक्षिण ध्रुवाबद्दल अधिक माहिती मिळवणे शक्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

Maratha Reservation News : गणेशोत्सवात जरांगे पाटलांनी उपोषण टाळावे

Sangameshwar News : २२ वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, गणेशोत्सवासाठी मुंबईहून आलेला गावी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT