Vivo T3 5G
Vivo T3 5G esakal
विज्ञान-तंत्र

Vivo T3 5G : दमदार प्रोसेसर आणि बॅटरीसह व्हिवोचा स्मार्टफोन आज होणार लाँच, जाणून घ्या ‘हे’ खास फिचर्स

Monika Lonkar –Kumbhar

Vivo T3 5G : सुप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी असलेल्या व्हिवोचा जगभरात डंका आहे. मागील काही वर्षांपासून कंपनीने विविध फिचर्स असलेले आणि बजेटमध्ये असणारे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. व्हिवो कंपनी आज एक दमदार स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या दमदार स्मार्टफोनचे नाव Vivo T3 5G असे आहे.

विशेष म्हणजे हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी या ब्रॅंडद्वारे या नव्या स्मार्टफोनबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लूसिव्हपणे फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीस येणार असल्याचे आधीच सांगण्यात आले आहे. हा स्मार्टफोन २१ मार्च अर्थात आज दुपारी १२ वाजेपर्यंत कंपनीतर्फे अधिकृतरित्या लाँच केला जाण्याची शक्यता आहे. Vivo T3 5G या स्मार्टफोनमध्ये कोणकोणते फिचर्स असणार? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Vivo T3 5G खास फिचर्स

व्हिवो कंपनीतर्फे या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी आणि Sony IMX882OIS सेन्सर असे खास फिचर्स देण्यात येणार आहेत. यासोबतच, Vivo T3 5G मध्ये 4K रेकॉर्डिंग आणि 2X पोट्रेट झूमची ही खास सुविधा असणार आहे.

विशेष म्हणजे व्हिवोचा हा स्मार्टफोन सुपरनाईट मोडसह bokeh Mode आणि फ्लिकर सेन्सह असणार आहे. आता या स्मार्टफोनच्या प्रोससरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर दिला आहे.

कंपनीच्या मते या स्मार्टफोमध्ये सर्वात वेगवान डिव्हाईस असणार आहे आणि गेमिंगप्रेमी लोकांना हा स्मार्टफोन आवडू शकतो. आता कलरबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी हा स्मार्टफोन क्रिस्टल फ्लेक या कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.

कॅमेरा कसा असणार?

Vivo T3 5G या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप असणार आहे. याबद्दल कंपनीने आधीच सांगितले आहे. कॅमेऱ्यामध्ये बोकेह लेन्ससह 50MP चा प्राथमिक कॅमेरा आणि 16MP चा सेल्फी कॅमेरा असणार आहे. हा कॅमेरा व्हिडिओ आणि सेल्फीसाठी खास असणार आहे.

आता या स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo T3 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 44w या फास्ट चार्जरची सुविधा असू शकते. या मोबाईलची अधिकृत किंमत कंपनीने अद्याप जाहीर जरी केली नसली तरी हा मोबाईल २० हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT