Vivo T4 Ultra price : स्मार्टफोन बाजारात स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असताना, Vivo कंपनीने आपला नवा प्रीमियम स्मार्टफोन Vivo T4 Ultra भारतात सादर केला आहे. हा स्मार्टफोन T4 सिरीजचा एक भाग असून याआधी Vivo T4 5G आणि T4x 5G हे मॉडेल्स लाँच करण्यात आले होते. नवीन Vivo T4 Ultra हा प्रगत फिचर्ससह सज्ज असून विशेषतः त्याचा 100x डिजिटल झूम, AI आधारित फीचर्स आणि दमदार डिस्प्ले यामुळे तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे.
Vivo T4 Ultra ची किंमत 37,999 पासून सुरू होते. ही किंमत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. याशिवाय, 12GB + 256GB व 12GB + 512GB हे दोन पर्याय अनुक्रमे 39,999 आणि 41,999 मध्ये उपलब्ध असतील. ग्राहकांसाठी Meteor Grey आणि Phoenix Gold हे दोन आकर्षक रंग पर्याय देण्यात आले आहेत.
हा स्मार्टफोन 18 जूनपासून Flipkart, Vivo India चा ई स्टोअर आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच, SBI, HDFC आणि Axis Bank कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 3000 पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
डिस्प्ले
Vivo T4 Ultra मध्ये 6.67 इंचांचा 1.5K क्वाड-कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. या स्क्रीनचा पीक ब्राइटनेस तब्बल 5,000 निट्सपर्यंत जातो. यामध्ये HDR10+ सपोर्ट आणि डोळ्यांसाठी SGS सर्टिफाइड लो ब्लू लाईट टेक्नॉलॉजी दिली आहे.
प्रोसेसर व सॉफ्टवेअर
हा स्मार्टफोन नवीनतम 4nm MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसरवर चालतो. यामध्ये LPDDR5 RAM (8GB/12GB) आणि UFS 3.1 स्टोरेज (256GB/512GB) चा पर्याय देण्यात आला आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, Vivo T4 Ultra मध्ये Android 15 आधारित FuntouchOS 15 दिलं गेलं आहे.
कॅमेरा सेटअप
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे
50MP Sony मुख्य कॅमेरा – OIS सपोर्टसह
8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा
50MP Sony पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा – 3x ऑप्टिकल झूम, 10x टेलीफोटो मॅक्रो आणि 100x डिजिटल झूम क्षमतेसह
सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो व्हिडिओ कॉलसाठीही अत्यंत उपयुक्त आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
हा स्मार्टफोन 5500mAh क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. अवघ्या काही मिनिटांत फोन चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.
Vivo T4 Ultra मध्ये स्मार्ट AI फीचर्सचा समावेश आहे
AI Note Assist – नोट्स तयार करण्यात मदत करणारा असिस्टंट
AI Erase – फोटोमधून नकोशी वस्तू हटवण्यासाठी
AI Transcript Assist – आवाजाचे मजकूरात रूपांतर
AI Call Translation – कॉल दरम्यान भाषांतर करण्याची सुविधा
याशिवाय, Google Circle to Search यासारखी स्मार्ट सर्च सुविधा आणि in-display fingerprint sensor, IP64 डस्ट व स्प्लॅश रेसिस्टन्स, 5G, Bluetooth 5.4, Wi-Fi, GPS with NavIC यांसारख्या आधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्सही देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.