vivo v25 series india launch august 17 check how to watch livestream expected price specifications 
विज्ञान-तंत्र

Vivo V25 Pro आज भारतात होणार दाखल; लाँचपूर्वी जाणून घ्या किंमत

सकाळ डिजिटल टीम

Vivo V25 series India launch : Vivo आज (17 ऑगस्ट) आपली जबरदस्त स्मार्टफोन सीरीज Vivo V25 लाँच करण्यासाठी सज्ज आहे. Vivo या सीरीजअंतर्गत Vivo V25e, V25 आणि V25 Pro सह अनेक डिव्हाईस लॉंच केले जाऊ शकतात. Vivo V25 सीरीज आज 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. कंपनी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाँच लाईव्ह-स्ट्रीम करेल. लॉन्च होण्यापूर्वी आपण या फोनच्या किंमती आणि फीचर्स संबंधित डिटेल्स जाणून घेऊयात.

Vivo V25 Pro ची संभाव्य किंमत

Vivo V25 Pro दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये भारतात लॉन्च केली जाऊ शकते. लीक झालेल्या माहितीनुसार, फोनच्या बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असेल. तर बेस मॉडेलची किंमत 39,999 रुपये असेल. दुसरीकडे, 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 43,999 रुपये असेल. विवो हा फोन सेलिंग ब्लू आणि प्युअर ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करेल. हा फोन बॅक कलर चेंजिंग फीचरसह येईल.

डिव्हाइस लॉन्च केल्यानंतर, Vivo चा हा फोन Flipkart, Vivo e-shop आणि Vivo stores वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. लीक झालेली किंमत खरी असल्यास, V25 Pro फोन OnePlus 10R आणि Realme GT Neo 3 शी स्पर्धा करेल. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेले हे दोन्ही फोन 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

Vivo V25 Pro चे संभाव्य फीचर्स

Vivo V25 Pro मध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर असेल, जो OnePlus Nord 2T, Oppo Reno8 5G आणि इतर फोनवर देण्यात आल्याप्रमाणे आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट आणि व्लॉग मोड, हायब्रिड इमेज स्टॅबिलायझेशनसह 64MP मुख्य कॅमेरासह येईल. फोनमध्ये 66W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4830mAh बॅटरी असेल. या व्यतिरिक्त, फोन 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह येईल आणि फोनमध्ये 8GB पर्यंत एक्सपांडेबल रॅम असेल. Vivo V25 Pro ची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT