Vodafone Idea 5G Network Launch esakal
विज्ञान-तंत्र

VI 5G Network : तब्बल 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर VI कंपनीने आणलं 5G नेटवर्क, ग्राहकांना काय फायदा होणार? जाणून घ्या

Vodafone Idea 5G Network Launch : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर Vodafone Idea (Vi) ने अखेर भारतात आपली 5G सेवा सुरू केली आहे. यामध्ये कोणत्या सुविधा आहेत आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Saisimran Ghashi

Vodafone Idea 5G Plans : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर Vodafone Idea (Vi) ने अखेर भारतात आपली 5G सेवा सुरू केली आहे. सध्या काही निवडक शहरांमध्येच ही सेवा उपलब्ध असली तरी यामुळे देशातील तिसऱ्या क्रमांकाचा टेलिकॉम ऑपरेटर म्हणून Vi ने 5G युगात पाऊल ठेवले आहे.

दोन वर्षांनंतर लाँच

2022 मध्ये झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात Vi ने सहभागी होऊनही त्यांचे 5G नेटवर्क सुरू करण्यात दोन वर्षांचा विलंब झाला. याच काळात Airtel आणि Jio यांनी ऑक्टोबर 2022 मध्येच 5G सेवा सुरू केली होती. मात्र आता Vi ने 3.3GHz आणि 26GHz स्पेक्ट्रम बँडचा वापर करत 17 प्रमुख शहरांमध्ये 5G लाँच केले आहे.

5G प्लान्स आणि किमती

Vi च्या 5G सेवेसाठी प्रीपेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी वेगळे प्लान्स उपलब्ध आहेत.

प्रीपेड ग्राहक : 475 रुपयांचा प्लान घेतल्यास 5G सेवेचा लाभ घेता येईल.

पोस्टपेड ग्राहक : REDX 1101 प्लानमध्ये 5G सेवा उपलब्ध आहे.

5G सेवा कोणत्या शहरांत सुरू?

Vi ची 5G सेवा सध्या मध्यम 3.5GHz बँड वापरून पुढील शहरांमध्ये उपलब्ध आहे.

1. राजस्थान : जयपूर (गॅलेक्सी सिनेमा, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया)

2. हरियाणा : करनाल (HSIIDC इंडस्ट्रियल एरिया, सेक्टर 3)

3. कोलकाता : सेक्टर-V, सॉल्ट लेक

4. केरळ : त्रिक्काकाडा, काकनाड

5. उत्तर प्रदेश (पूर्व) : लखनऊ (विभूती खंड, गोमतीनगर)

6. उत्तर प्रदेश (पश्चिम) : आग्रा (JP हॉटेल जवळ, फतेहाबाद रोड)

7. मध्य प्रदेश : इंदूर (इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स, परदेशीपुरा)

8. गुजरात : अहमदाबाद (कॉर्पोरेट रोड, मकरबा, प्रह्लाद नगर)

9. आंध्र प्रदेश : हैदराबाद (आयडा उप्पल, रंगा रेड्डी)

10. पश्चिम बंगाल : सिलीगुडी (सिटी प्लाझा, सेवोक रोड)

11. बिहार : पाटणा (आनिसाबाद गोलंबर)

12. मुंबई : वरळी, मरोल अंधेरी ईस्ट

13. कर्नाटक : बेंगळुरू (डेअरी सर्कल)

14. पंजाब : जालंधर (कोट कलां)

15. तामिळनाडू : चेन्नई (पेरूंगुडी, नेसापक्कम)

16. महाराष्ट्र : पुणे (शिवाजीनगर)

17. दिल्ली : ओखला इंडस्ट्रियल एरिया फेज 2, इंडिया गेट, प्रगती मैदान

काय आहे पुढील पाऊल?

सध्या 5G सेवा निवडक भागांपुरती मर्यादित असली तरी Vi ने या लाँचमुळे मोठी पायरी गाठली आहे. कंपनी आपल्या 5G नेटवर्कचे आणखी विस्तार करत असून पुढील काही महिन्यांत लाखो ग्राहकांना जलद इंटरनेट आणि उत्तम कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा आहे.

Vodafone Idea 5G लाँचमुळे टेलिकॉम क्षेत्रात नवीन स्पर्धेला सुरुवात झाली असून ग्राहकांना आता अधिक चांगल्या सेवा अनुभवायला मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune News : बालगंधर्वच्या आवारात हॉटेलचे पार्किंग; हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला केले मॅनेज

Hyundai Salary Hike : ह्युंदाई कर्मचाऱ्यांना नवरात्रीची मोठी भेट, मिळाली 'इतक्या' हजारांची भरघोस पगारवाढ

SCROLL FOR NEXT