विज्ञान-तंत्र

Whatsapp Tricks : कोणताही इमोजी सर्च न करता आपोआप येईल तुमच्या मेसेजमध्ये; द्या फक्त 'ही' एक कमांड

Emoji Search Trick : आजकाल फोनवर व्हॉइस मेसेज पाठवणे खूप सोपे झाले आहे. पण कधी कधी एखाद्या मेसेजच्या शेवटी इमोजी पाठवायचे असते. पण आपल्याला ते शोधत राहावे लागते.

Saisimran Ghashi

Tech Tips : आजकाल फोनवर व्हॉइस मेसेज पाठवणे खूप सोपे झाले आहे. पण कधी कधी एखाद्या मेसेजच्या शेवटी इमोजी पाठवायचे असते. पण आपल्याला ते शोधत राहावे लागते. कारण फोन त्याचा अर्थ समजून घेत नाही. पण आता या समस्येवर सोपा उपाय आहे. तुमच्या आवाजातून मेसेज टाइप करताना देखील तुम्ही तुम्हाला हवे ते इमोजी चटकन पाठवू शकता.

कशी वापरता येते ही ट्रिक?

ही ट्रिक वापरण्याआधी आधी गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या फोनमध्ये व्हॉइस टू टेक्स्ट म्हणजे बोलून लिहिण्याची सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या फोनमध्ये इमोजीपीडिया हा अॅप असल्यास उत्तम. कारण इमोजींची नावं आठवत नसल्यास तुम्ही इमोजीपीडियावरून त्यांची नावं शोधू शकता.

चला तर मग पाहूया iOS आणि Android वर व्हॉइस मेसेजमध्ये इमोजी कसे वापरायचे...

iPhone साठी पर्याय

ज्या अॅपवरून मेसेज पाठवायचे आहे ते अॅप उघडा.

जिथे टेक्स्ट टाइप करायचा असतो तिथे मायक्रोफोन बटण दाबा आणि व्हॉइस टू टेक्स्ट सुरू करा.

मेसेज बोलून सांगा आणि शेवटी ज्या इमोजी वापरायचे आहे त्या इमोजीची नाव (उदा: Laugh) आणि मागून "इमोजी" असे शब्द सांगा. (उदा: "Very Funny Laughing Emoji")

Android साठी पर्याय

ज्या अॅपवरून मेसेज पाठवायचे आहे ते अॅप उघडा.

टेक्स्ट टाइप करताना येणारे मायक्रोफोन बटण दाबा.

मेसेज बोलून सांगा आणि शेवटी ज्या इमोजी वापरायचे आहे त्या इमोजीची नाव (उदा: हार्ट) आणि मागून "इमोजी" असे शब्द सांगा. (उदा: "ऑके, सी यु एट नाईट रेड हार्ट इमोजी") आणि झालं.

तुमचे व्हॉइस मेसेज आता इमोजीसह पाठवले जाणार आहे. जर तुमच्या फोनमध्ये इंग्रजीशिवाय दुसरी भाषा सेट केली असेल तर त्या भाषेसाठी व्हॉइस रिझल्ट सेटिंग्समध्ये जाऊन तुमची भाषा निवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT