Volkswagen Taigun esakal
विज्ञान-तंत्र

Volkswagen Taigunची महिन्याभरात १८ हजार बुकिंग,जाणून घ्या फिचर्स

लाँच नंतर धमाल गाजवणारी एसयूव्ही आहे Volkswagen Taigun.फोक्सवॅगन इंडियाने २३ सप्टेंबर २०२१ ला ती भारतीय बाजारात लाँच केली होती.

सकाळ डिजिटल टीम

एसयूव्ही आता लोकांची पहिली पसंत होत चालली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात एकानंतर एक नवीन एसयूव्ही लाँच होत असून त्यांची जोरदार खरेदीही होतेय. Mahindra XUV700 पासून एमजी अॅस्टरपर्यंत सर्वांत सर्वांना बंपर बुकिंग मिळत आहे. आता यात एक नवीन एसयूव्ही जोडले गेले आहे. तिच्या लाँचिंगला आताच एक महिना झाला असून १८ हजार युनिट बुक झाली आहेत. जाणून घ्या तिच्याविषयी...

- लाँच नंतर धमाल गाजवणारी एसयूव्ही आहे Volkswagen Taigun.फोक्सवॅगन इंडियाने २३ सप्टेंबर २०२१ ला ती भारतीय बाजारात लाँच केली होती. लाँचपूर्वीच कंपनीकडे तिची १२ हजार पूर्वबुकिंग नोंदविण्यात आली होती. फोक्सवॅगनची ही पहिली इंडिया स्पेसिफिक एसयूव्ही कार आहे.

- लाँचनंतर कंपनीने दररोज सरासरी २५० फोक्सवॅगन तैगनची बुकिंग केली आहे. या ५ सीटर एसयूव्हीची आतापर्यंत १८ हजार युनिट बुक झाली आहे. कंपनी तिचे उत्पादन भारतातच करत आहे आणि २०२१ साठी विक्रीसाठी खुली झाली आहे. याचा अर्थ सदरील कार २०२२ मध्ये खरेदी करता येईल.

- फोक्सवॅगन तैगनमध्ये टीएसआय टेक्नाॅलाॅजी आधारित इंजिन ऑप्शन मिळेल. हे ऑप्शन १.० लीटरचे टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५ लीटर टीएसआय पेट्रोल इंजिनचे आहे. ये क्रमश: 11 bhp चे मॅक्सिमम पाॅवर, १७५ Nm चे पीक टाॅर्क आणि १४८ bhp ची मॅक्सिमम पाॅवर आणि २५० Nm चे पीक टाॅर्क जेनरेट करते.

- फोक्सवॅगन तैगनचे १.० लीटर पेट्रोल व्हेरिएंट ६ स्पीडचे मॅन्युएल आणि ऑटोमॅटिक गिअर बाॅक्सबरोबर येते. दुसरीकडे १.५ लीटर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये कंपनीने ६ स्पीडचे मॅन्युएल आणि ७ स्पीडचे डीएसजी ऑटोमॅटिक गिअरबाॅक्स ऑप्शन दिले आहे.

- कंपनीने फोक्सवॅगन तैगन ५ रंगात उपलब्ध आहे. ती Curcuma Yellow, Wild Cherry Red, Candy White, Reflex Silver आणि Carbon Steel Grey या रंगात उपलब्ध आहे. फोक्सवॅगन तैगनमध्ये सुरक्षततेची सर्व काळजी घेण्यात आली आहे. ६ एअरबॅग, ३- पाॅईन्ट सीटबेल्ट, चाईल्ड सीट माऊंट, हिल होल्ड कंट्रोल या सारखे ४० पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स आहेत.

- कंपनीने फोक्सवॅगनची दोन व्हेरियंट 'डायनामिक लाईन' आणि परफाॅर्मन्स लाईन सादर केले आहेत. यात डायनामिक लाईनचे ३ ट्रीम आणि परफाॅर्मन्स लाईनचे २ ट्रिम आहे. या कारची सर्वात बेसिक माॅडलची किंमत १०.४९ लाखांपासून सुरु होते. दुसरीकडे सर्वात हाय माॅडलची किंमत १७.४९ लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT