ChatGPT News esakal
विज्ञान-तंत्र

ChatGPT काय आहे? त्याचा कसा वापर कराल?

सकाळ डिजिटल टीम

विजय जाधव

आधी कोणतीही माहिती शोधण्यासाठी आपल्याकडे गुगल हा एक पर्याय होता. पण गुगल कडून आपल्याला फक्त माहितीचा स्रोत मिळत होता. पण तीच माहिती आपल्याला हव्या त्या प्रकारात देणारं दुसरं एखाद टूल मिळालं तर? म्हणजे, समजा तुम्हाला एका ठराविक विषयाची माहिती घेऊन त्याचं एका लेखात रूपांतर करायचंय किंवा तुम्हाला तुमच्या बॉसला सुट्टीसाठी भला मोठा मेल लिहायचा आहे असं एखादं टूल मिळालं तर...

आता, ChatGPT चा वापर करून तुम्ही अगदी काही क्षणात तो लेख आणि तुमच्या बॉससाठी सुट्टीचा मेल लिहू शकता. धक्का बसला ना वाचून. हे टूल बनवलंय OpenAI नावाच्या एका कंपनीनं. या कंपनीची स्थापना केली इलॉन मस्क आणि आत्ताचे OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी. पण काही कारणांमुळे इलॉन मस्क २०१८ मध्ये कंपनीच्या बोर्ड मधून पायउतार झाले.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

मुळात हा AI प्रोग्रॅम एक चॅटबॉट आहे जो तुमच्या सोबत संभाषण करतो. तुम्ही त्याला प्रश्न विचारता आणि तो तुम्हाला त्याची उत्तरे देतो. एखाद्या विषयाशी संबंधित असलेला इंटरनेटवरील विविध ठिकाणचा मजकूर एकत्र करून हा प्रोग्रॅम तुम्हाला तो मजकूर मुद्देसूद सादर करतो.

ChatGPT कसा वापर कराल

https://chat.openai.com/chat या वेबसाईटवर जाऊन सर्वात आधी तुम्हाला तुमचं खातं उघडावं लागेल. त्यानंतर पुन्हा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला याचा वापर कसा करावा याच्या काही सूचना दिसतील आणि नंतर खाली एक पट्टी दिसेल ज्यात तुम्ही या चॅटबॉटला हवे ते प्रश्न विचारू शकता. यामध्ये तुम्ही कोणत्याही विषयावरील प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळवू शकता.

ChatGPT वापरून तुम्ही काय करू शकता

कोणत्याही ठराविक विषयावरील प्रश्न विचारून हवी ती माहिती तुम्ही मिळवू शकता. एखाद्या आजारावर काय उपाय करावे, कोणती काळजी घ्यावी, ठराविक विषयावर लेख कसा लिहावा, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची संपूर्ण माहिती तुम्हाला क्षणांत मिळू शकते ती सुद्धा एकाच ठिकाणी. एखादी छोटी गोष्ट असेल किंवा लहानसा विनोद सुद्दा हा चॅटबॉट तुम्हाला सांगू शकतो, एवढंच काय एखादी सुंदर कवितासुद्धा हा चॅटबॉट तुम्हाला लिहून देऊ शकतो.

ChatGPT च्या वापरामुळे नोकऱ्या जातील काय

या प्रश्नाचं ठोस उत्तर देणं आत्तातरी शक्य नसलं तरी एखाद्या विषयावर लेख लिहून देणारं, कोणत्याही विषयावर कविता करणारं हे टूल पत्रकार लोकांसाठी धोक्याची घंटा आहे एवढं नक्की. हा चॅटबॉट ठराविक विषयावर विस्तृतपणे संशोधन करून माहिती पुरवू शकत नाही किंवा सध्या त्याची तेवढी क्षमता नसली तरी भविष्यात या क्षमता त्याच्याकडे असतील एवढं आपण नक्की म्हणून शकतो.

आम्ही या चॅटबॉटला काही प्रश्न विचारले आणि त्याने दिलेली भन्नाट उत्तरे

१) ताप कसा कमी करायचा?

२) मला एक विनोद सांगून दाखव

३) प्रेमावर एक कविता लिहून दे

४) भ्रष्टाचार कसा थांबवायचा?

५) आजारी म्हणून सुट्टी हवीये असा एक मेल लिहून दे

हा चॅटबॉट सध्या प्रायोगिक तत्वावर वापरला जात आहे. सध्या तो वापरण्यासाठी मोफत असला तरी सॅम अल्टमन यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच त्याला मॉनेटाईझ केलं जाणार आहे. एवढंच नाही तर त्याची अजून एक विकसित आवृत्ती लवकरच येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT