OpenAI Esakal
विज्ञान-तंत्र

Project Q* : प्रोजेक्ट क्यू स्टार आहे तरी काय? OpanAiच्या सिक्रेट प्रोजेक्टची का होतोय इतकी चर्चा

What is Project Q Star? Why is there so much talk about OpanAi's secret project?

रोहित कणसे

एआय टूल चॅट जीपीटी मागील काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आहे. या कंपनीचा सीईओ सॅम ऑल्टमन काढून टाकल्यानंतर पुन्हा ओपनएआयमध्ये परतला आहे. गेल्या आठवड्यात 5 दिवसांच्या गोंधळानंतर पुन्हा एकदा कंपनीची जबाबदारी पुन्हा सॅम ऑल्टमनकडे आली आहे. ओपनएआय ही आजच्या काळातील एक प्रसिद्ध एआय तंत्रज्ञान फर्म आहे आणि गेल्या वर्षी तिने चॅटजीपीटी लॉच केलं होतं.

कंपनीने एका ब्लॉगमध्ये सॅम ऑल्टमनला हटवण्याचं कारण सांगितलं होतं. ऑल्टमनचे कंपनीत पुनरागमन झाल्याने एक नवी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे चर्चेला उधाण आले आहे आहे. ऑल्टमनला काढून टाकण्यामागचं कारण हे प्रोजेक्ट क्यू* (Project Q*) असल्याचे सांगितलं जात आहे. प्रोजेक्ट क्यू * म्हणजे काय? आणि यामुळे सॅम ऑल्टमनला कंपनीतून का काढून टाकावे लागले? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

ओपनएआयच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी सॅम ऑल्टमनला कंपनीतून बाहेरचा मार्ग दाखवल्यानंतर ओपनएआयच्या रिसर्चर्सचं एक पत्र समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, संशोधकांनी बोर्डाला पत्र लिहून धोक्याची माहिती दिली होती. ज्यामध्ये त्यांनी डायरेक्टर्सना एका शक्तिशाली एआयबद्दल माहिती दिली होती, जे मानवांसाठी धोकादायक ठरू शकते. आता या गूढ एआयने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ओपनएआयचा प्रोजेक्ट क्यू* काय आहे?

रिपोर्ट्स समोर आल्यानंतर ओपनएआयच्या प्रोजेक्ट क्यू* (क्यू स्टार) ने आल्यापासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा एआयचा एक नवीन शोध आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यावर बराच काळ काम सुरू असताना फार कमी लोकांना याची माहिती होती.

जेव्हा सॅम ऑल्टमनला ओपनएआयमधून काढून टाकण्यात आलं, तेव्हा रॉयटर्स या वृत्तसंस्थेला एक ईमेल मिळाला, ज्यात या प्रोजेक्टबद्दल माहिती देण्यात आली.

काय आहे ओपनएआय चा प्रोजेक्ट क्यू*?

रिपोर्ट्सनुसार प्रोजेक्ट क्यू*, एक आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (एजीआय) आहे, जो गणिताचे किचकट प्रश्न स्वत: सोडवू शकतो. त्याच्याकडे माणसांप्रमाणेच तर्क लावून समस्या सोडवण्याची क्षमता आहे.

सॅम ऑल्टमन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला म्हटले होते की, एआय मानवांपेक्षा हुशार असू शकतो. ते बनविण्याचे श्रेय सुत्स्केवर यांना दिले जाते. त्यानंतर सिजमान सिदोर आणि जेकब पाचोकी यांनी ते तंत्रज्ञान पुढे नेले आहे. या प्रकारच्या एआयबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र या प्रोजेक्टची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.

हे धोकादायक का आहे?

रिसर्चर्सनी लिहिलेल्या पत्रात प्रोजेक्ट क्यू* ची क्षमता आणि त्यातून निर्माण होणारे धोके याबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा प्रोजेक्ट थांबविण्यासाठी ओपनएआयकडे सध्या पुरेसे साधन नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या मॉडेलमुळे कथित रित्या कंपनीत विरोध सुरू झाला, यामुळे मानवतेला धोका निर्माण होऊ शकतो, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. हा इशारा ऑल्टमनच्या हकालपट्टीचे प्रमुख कारण मानले जात आहे.

अॅडव्हांस लॉजिकल रीझनींग समजून घेण्याची क्षमता:

प्रोजेक्ट क्यू * बद्दल उपलब्ध माहिती सांगते की ते अॅडव्हांस लॉजिकल रीझनींग समजू शकते. ही स्वतःमध्ये एक नवीन क्षमता आहे कारण याआधी, कोणत्याही एआय मॉडेलला अद्याप शक्य झाले नव्हते.

डीप लर्निंग आणि प्रोग्राम चे नियम :

रिसर्टक सोफिया कलानोस्का यांनी बिझनेस इनसायडरला सांगितले की, प्रोजेक्ट क्यू* हे नाव दोन एआयएकत्र करून तयार करण्यात आले आहे. यात क्यू-लर्निंग आणि * सर्च आहे. त्यांनी सांगितले की, नवीन मॉडेल खूप प्रगत आहे. हे एआय मॉडेल केवळ डेटामधून शिकत नाही, तर त्याला मानवाप्रमाणे कसे लागू करावे हे देखील त्याला माहित आहे. अशा परिस्थितीत आतापासूनच त्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

नवीन कल्पना विकसित करण्याची क्षमता :

आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या एआय मॉडेलने जुनी माहिती जमवून त्यामधून रिझल्ट दिले. आता प्रोजेक्ट क्यू* मैलाचा दगड ठरू शकतो. हा एआय स्वत: कल्पना विकसित करू शकतो. तसेच समस्यांवर तोडगा काढू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

SCROLL FOR NEXT