Google Sakal
विज्ञान-तंत्र

व्हॉट्‌सअ‍ॅप-गूगलची मोठी कारवाई! 22 लाख भारतीय अकाउंट्‌सवर बंदी

व्हॉट्‌सअ‍ॅप-गूगलची मोठी कारवाई! 22 लाख भारतीय अकाउंट्‌सवर बंदी

श्रीनिवास दुध्याल

गूगलला सप्टेंबर महिन्यात यूजर्सकडून 29,842 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात गूगलला 76,967 कंटेंट चुकीचे असल्याचे आढळून आले आणि त्यांनी हे अकाउंट ब्लॉक केले.

नवीन आयटी नियमांतर्गत WhatsApp आणि गूगलचे नियम मोडणाऱ्या यूजर्सवर गूगल आणि WhatsApp कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये Google ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 76,967 यूजर्सवर कारवाई केली आणि त्यांचे अकाउंट ब्लॉक केले. त्याचवेळी, फेसबुकच्या (Facebook) मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने सुमारे 22 लाख WhatsApp खात्यांवर बंदी घातली आहे. गूगल आणि WhatsApp ने त्यांच्या मासिक अहवालात याचा खुलासा केला आहे.

Google ची कारवाई

गूगलला सप्टेंबर महिन्यात यूजर्सकडून 29,842 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात गूगलला 76,967 कंटेंट चुकीचे असल्याचे आढळून आले आणि त्यांनी हे अकाउंट ब्लॉक केले. गूगलने आपल्या मंथली ट्रान्स्परेन्सी रिपोर्टमध्ये याचा खुलासा केला आहे. Google ने ऑटोमेटेड रूटनुसार 4,50,246 चुकीचे कंटेंट ओळखले. यातील बहुतांश तक्रारी थर्ड पार्टी संबंधित आहेत, ज्या स्थानिक नियमांच्या विरोधात आहेत. तसेच काही तक्रारी पेटंट आणि पायरसीच्या आहेत.

गूगलवर आलेल्या तक्रारी

  • कॉपीराइट : 76,444

  • ट्रेडमार्क : 493

  • ग्राफिक सेक्‍सुअल कंटेंट : 11

  • न्यायालयाचा आदेश : 10

  • काउंटरफीट : 5

WhatsApp ने 22 लाखांहून अधिक WhatsApp अकाउंट बॅन केले आहेत. कंपनीने सांगितले की, यूजर्सची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या खात्यांची संख्या 22 लाख 9 हजार आहे. WhatsApp नुसार, सप्टेंबरमध्ये 560 यूजर्सच्या तक्रारी आल्या.

'या' WhatsApp तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली

  • अकाउंट सपोर्ट : 121

  • अपील - 309

  • इतर सपोर्ट आणि प्रॉडक्‍ट सपोर्ट : 49

  • सुरक्षा : 32

WhatsApp च्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत WhatsApp ने आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आणि इतर तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट आणि तज्ज्ञांसाठी सतत गुंतवणूक केली आहे, जेणेकरून ते वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठेवण्यासाठी, ऑटोमेटेड रूटने बनावट पोस्ट आणि सामग्री ओळखता यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam: ''बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय'' शरद पवारांचे शब्द; त्यांनाही 'मातोश्री'वर रोखलं होतं!

आईशिवाय वाढलेली तू... सायलीचा अपमान होताच भडकणार प्रतिमा; प्रियाच्या कानशिलात लगावणार, आजच्या भागात काय घडणार?

Mystery of Umoja Village : 'या' गावात पुरुषांना आहे प्रवेशबंदी, तरीही महिला होतात गर्भवती; काय आहे गूढ जाणून घ्या....

Stock Market Closing: शेअर बाजाराने घेतला यू-टर्न; सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

Mumbai Metro Aqua Line: मुंबईमध्ये धावत्या भूमिगत मेट्रोत उडाल्या ठिणग्या; प्रवाशांत घबराट अन्...

SCROLL FOR NEXT