WhatsApp Banned 17 Lakh Plus Indian Accounts
WhatsApp Banned 17 Lakh Plus Indian Accounts  Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp ने बंद केले 17 लाखांहून अधिक भारतीय अकाउंट, पाहा कारण

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर फेक न्यूज आणि अक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्यांविरोधात सोशल मीडिया App अलर्ट आहेत. याविरोधात सतत कठोर पावले उचलली जातात. यातच सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) सहव्या मासिक सुरक्षा रिपोर्टमध्ये (user safety monthly report) म्हटले आहे की त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये 17.5 लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट बंद केले आहेत, तर या कालावधीत तब्बल 602 तक्रारी कंपनीकडे आल्या आहेत. त्यांच्या नुकतेच प्रसिध्द झालेल्या अहवालात, या कालावधीत WhatsApp वरील 17,59,000 भारतीय खाती बंद करण्यात आली असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. (WhatsApp Banned 17 Lakh Plus Indian Accounts)

WhatsApp च्या प्रवक्त्याने सांगितले की, IT नियम 2021 (New IT Rules) नुसार, आम्ही नोव्हेंबर महिन्यासाठी आमचा सहावा मासिक अहवाल प्रकाशित केला आहे. या युजर-सुरक्षा रिपोर्टमध्ये वापरकर्त्याच्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे केलेल्या संबंधित कारवाई बद्दल माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कंपनी भारतीय वापरकर्त्यांचे खाते त्याच्या +91 पासून सुरु होणाऱ्या फोन नंबरद्वारे ओळखले जातात.

प्रवक्त्याने सांगितले की व्हॉट्सअॅपने नोव्हेंबरमध्ये 17.5 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपने यापूर्वी म्हटले होते की 95% पेक्षा जास्त निर्बंध ऑटोमॅटीक किंवा बल्क मेसेजिंग (स्पॅम) च्या अनधिकृत वापरामुळे करण्यात आली आहेत.

Google ची कारवाई

टेक जायंट Google ला नोव्हेंबरमध्ये वापरकर्त्यांकडून 26,087 तक्रारी प्राप्त झाल्या, ज्याच्या आधारावर 61,114 कंटेट काढून टाकण्यात आला आहे. कंपनीने शुक्रवारी जारी केलेल्या मासिक ट्रांसपरंसी रिपोर्टमध्ये ही माहिती दिली. वापरकर्त्यांच्या तक्रारींव्यतिरिक्त, Google ने ऑटोमॅटीक व्हेरिफीकेशनच्या आधारावर नोव्हेंबर 2021 मध्ये 3,75,468 कंटेंट हटवला होता.

कंपनीने सांगितले की, नोव्हेंबरमध्ये भारतातील वैयक्तिक वापरकर्त्यांकडून 24,569 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे, कंपनीने 48,594 आक्षेपार्ह कंटेंट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून आणि 3,84,509 स्वतःहून काढून टाकला आहे.

कंपनीने सांगीतले की, 26 मे रोजी लागू करण्यात आलेल्या भारताच्या आयटी नियमांचे पालन करत ही माहिती दिली आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये Google ने म्हटले आहे की नोव्हेंबर महिन्यात (नोव्हेंबर 1-30, 2021), भारतातील वैयक्तिक वापरकर्त्यांकडून 26,087 तक्रारी त्याच्या सिस्टममध्ये प्राप्त झाल्या होत्या आणि या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT