WhatsApp google
विज्ञान-तंत्र

WhatsApp News : ऑगस्ट महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने बॅन केली 74 लाख खाती; 'ही' आहेत कारणं?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपने ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल ७४ लाख युजर्सची खाती बंद केली आहेत. आयटी नियमांनुसार खाती बंद करण्यात आल्याचं मासिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.

मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी कसलीही सूचना न देता ३५ लाख खाती बंद केली होती. आता तब्बल ७४ लाख खाती बंद केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

'युजर सेफ्टी रिपोर्ट'च्या अहवालानुसार प्राप्त झालेल्या तक्रारी आणि मेसेजिंग Appचा चुकीच्या पद्धतीने वापर, या कारणांस्तव व्हॉट्सअ‍ॅपने ही कारवाई केली आहे.

WhatsApp च्या मासिक अहवालामध्ये म्हटलेलं आहे की, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान एकूण 7,420,748 व्हॉट्सअ‍ॅप खाती बॅन करण्यात आली आहेत. यापैकी 3,506,905 खाती वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी प्रतिबंधित करण्यात आली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने 'व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल' हे फिचर सुरु केलेले आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि संस्थांनी आपली खाती त्यावर उघडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT