whatsapp major crackdown 85 lakh indian-accounts banned esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Ban Indian Accounts : हे काय नवीन! व्हॉट्सअ‍ॅपने बंद केले ८५ लाख भारतीय अकाउंट्स, नेमकं प्रकरण काय?

meta reports 85 lakh indian whatsapp accounts banned : Meta कंपनीच्या WhatsApp या लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅपने भारतातील 85 लाखांहून अधिक वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत.

Saisimran Ghashi

Whatsapp Bans Indian Accounts : मेटा कंपनीच्या WhatsApp या लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅपने सप्टेंबर महिन्यात भारतातील 85 लाखांहून अधिक वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत. 2021 च्या नवीन आयटी नियमांच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आलं असून, गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने हे कठोर पाऊल उचलले आहे.

सप्टेंबर महिन्यात सादर करण्यात आलेल्या मासिक अहवालात, कंपनीने 16.58 लाख खाती स्वतःहून बंद केली असून, वापरकर्त्यांच्या कोणत्याही तक्रारीशिवाय हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या काळात WhatsApp ला 8,161 तक्रारी मिळाल्या, ज्यात केवळ 97 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर, तक्रार निवारण समितीच्या दोन आदेशांचेही कंपनीने पालन केले असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

2021 चे नवीन आयटी नियम

आयटी नियम 2021 नुसार, भारतात 50,000 पेक्षा अधिक वापरकर्त्यांची संख्या असलेल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना मासिक अहवाल प्रकाशित करणे बंधनकारक आहे. या अहवालात वापरकर्त्यांकडून नोंदवलेली खाती, कंपनीने केलेली कारवाई आणि तक्रार निवारण समितीचे मार्गदर्शन या गोष्टींचा तपशील असतो.

WhatsApp ने स्पष्ट केलं आहे की, वापरकर्त्यांना सुरक्षितता आणि पारदर्शकतेचं आश्वासन देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. कंपनीने सांगितलं की, वापरकर्ते व्हॉट्सअॅपवर हानिकारक सामग्री आणि संपर्कांना थेट अॅपमधून ब्लॉक आणि रिपोर्ट करू शकतात. कंपनीने गैरसमज पसरविणे, सायबर सुरक्षेत सुधारणा करणे, आणि निवडणुकीतील पारदर्शकता कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

ऑगस्ट महिन्यातही WhatsApp ने सुमारे 84.58 लाख खाती बंद केली होती, ज्यात 16.61 लाख खाती स्वतःहून बंद करण्यात आली होती. आता वापरकर्त्यांना सुधारित फीचर्स मिळत असून, त्यात वैयक्तिक यादी बनविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे संपर्क आणि ग्रुप चॅट अधिक सोयीस्कर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT