Whatsapp Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Features: व्हॉट्सअ‍ॅपच्या वॉर्निग मेसेजने यूजर्समध्ये खळबळ; वाचा नेमकं प्रकरण

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर लाँच करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त सुरक्षेसाठी View Once फीचर देखील आणले आहे.

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp Security Features: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp सातत्याने यूजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असते. नवीन फीचरसोबतच यूजर्सची माहिती व चॅट सुरक्षित राहावे, यासाठी देखील कंपनीचा प्रयत्न असतो. यासाठी कंपनीने एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेज, हाइडिंग स्टेट्स, व्ह्यू वन्स स्क्रीनशॉट्स आणि ब्लॉकिंग स्पॅम मेसेज असे अनेक सेफ्टी फीचर्स जारी केले आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वीच View Once mode फीचर लाँच केले होते, ज्यामुळे इतर यूजर्सला स्क्रीनशॉट काढता येत नसे.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

मात्र, व्ह्यू वन्स फीचरनंतर देखील अनेक यूजर्स नियम मोडत मेसेजचे स्क्रीनशॉट काढत असतात. अनेकदा व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट काढताना एक वॉर्निंग मेसेज समोर येतो. प्रायव्हसीमुळे स्क्रीनशॉट काढता येणार नाही, अशी वॉर्निंग यूजरला दिली जाते. व्ह्यू वन्स फोटो असल्याने अधिक गोपनियता पाळली जाते. व्ह्यू वन्स मेसेज तुम्ही एकदा पाहिल्यावर आपोआप गायब होतात व तुम्ही इतरांना शेअर देखील करू शकत नाही.

यूजर्सचे चॅट अधिक सुरक्षित राहावे, यासाठी हे खास फीचर आणण्यात आले आहे. एखादी गोपनिय व खासगी माहिती शेअर करायची असल्यास व्ह्यू वन्स हे फीचर खूपच उपयोगी येते. तुम्हाला देखील स्क्रीनशॉट काढताना अशाप्रकारची वॉर्निंग येत असल्यास काही स्टेप्स फॉलो करून View Once mode बंद करू शकता.

View Once mode फीचर सहज करू शकता बंद

  • सर्वात प्रथम WhatsApp चॅट ओपन करा.

  • आता कॉन्टॅक्ट नेमवर क्लिकवर करा.

  • पुढे डिसअपेरिंग मेसेजवर क्लिक करा.

  • आता कंटिन्यूवर क्लिक करून हा पर्याय बंद करा.

  • ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही सहज चॅटमधील View Once फीचर बंद करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT