WhatsApp Feature google
विज्ञान-तंत्र

WhatsApp Feature : व्हॉट्सअॅप चॅटसाठी आता येणार हे नवे फीचर

नवीन अपडेटनंतर, व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते त्यांच्या अँड्रॉइड फोनचे चॅट सहजपणे दुसऱ्या अँड्रॉईड फोनवर ट्रान्सफर करू शकतील.

नमिता धुरी

मुंबई : मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अलीकडेच एक प्रॉक्सी फीचर जाहीर केले आहे जे वापरकर्त्यांना इंटरनेट किंवा अॅप बंद असताना देखील संदेश पाठवू आणि प्राप्त करण्यास अनुमती देईल.

आता व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे. नवीन अपडेटनंतर, व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते त्यांच्या अँड्रॉइड फोनचे चॅट सहजपणे दुसऱ्या अँड्रॉईड फोनवर ट्रान्सफर करू शकतील. हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

विशेष बाब म्हणजे यासाठी चॅट बॅकअपची गरज भासणार नाही, म्हणजेच तुम्ही तुमच्या चॅटचा बॅकअप घेतला नसला तरीही तुम्ही चॅट दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर करू शकाल. सध्या, व्हॉट्सअॅप चॅट्स फक्त क्लाउड अकाउंटवर बॅकअप घेतल्यासच ट्रान्सफर केल्या जातात. सध्या व्हॉट्सअॅप चॅट्सच्या बॅकअपसाठी गुगल ड्राइव्हची सुविधा उपलब्ध आहे.

व्हॉट्सअॅपच्या सर्व आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या एका साइटने या नवीन फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचरची चाचणी व्हॉट्सअॅप अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.23.1.26 वर केली जात आहे. नवीन फीचर अॅपच्या सेटिंग्ज टॅबमध्ये आढळू शकते. चॅट ट्रान्सफर करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे.

WhatsApp Feature

व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरची सध्या बीटा व्हर्जनवर चाचणी केली जात असून हे फीचर कधी लॉन्च होणार आहे याबाबत स्पष्टता नाही. हे फीचर सुरू केल्यानंतर, Android चॅट्स ट्रान्सफर करणे खूप सोपे होईल, कारण बरेच लोक अजूनही त्यांच्या चॅटचा बॅकअप घेत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल, थोड्याच वेळात महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT