WhatsApp Beta Reveals iOS Themes, Username PIN Feature on Android esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Username PIN Feature : व्हॉट्सॲपमध्ये नव्या फीचरची एंट्री; बनवा इंस्टाग्रामसारखं यूजरनेम

WhatsApp Beta Reveals iOS Themes, Username PIN Feature on Android : युजरनेम पिन या फीचरमुळे वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपवर युजरनेम सेट करता येईल आणि त्यासोबत पिनही निश्चित करता येईल. यामुळे अज्ञात वापरकर्त्यांकडून येणाऱ्या संदेशांपासून त्यांचे संरक्षण होईल.

Saisimran Ghashi

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी कंपनी दोन नवीन फीचर्सवर काम करत असल्याचे समोर आले आहे. यातील पहिले फीचर म्हणजे चॅट थीम्स. या फीचरद्वारे वापरकर्ते चॅट बॅकग्राउंड आणि बबलचा रंग बदलू शकणार आहेत. सध्या कंपनीने काही प्रीसेट थीम्स तयार केल्या आहेत, तसेच वापरकर्ते स्वतःचेही कस्टम रंग आणि वॉलपेपर निवडू शकणार आहेत.

दुसरे फीचर म्हणजे युजरनेम पिन. या फीचरमुळे वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपवर युजरनेम सेट करता येईल आणि त्यासोबत पिनही निश्चित करता येईल. यामुळे अज्ञात वापरकर्त्यांकडून येणाऱ्या संदेशांपासून त्यांचे संरक्षण होईल. वापरकर्त्यांनी निवडलेला युजरनेम आणि पिन ही माहिती त्यांना मेसेज पाठवायचा असेल त्या व्यक्तीला माहिती करावी लागेल. त्यामुळे स्पॅम आणि अनावश्यक मेसेजेसपासून वाचण्यासाठी हा फीचर उपयुक्त ठरेल.

या दोन्ही फीचर्स अजून विकासाच्या अवस्थेत आहेत. मात्र, भविष्यात यांची चाचणी बीटा टेस्टर्ससाठी सुरु होईल आणि त्यानंतर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात येतील. या फीचर्समुळे वापरकर्त्यांचा व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव आणखी चांगला आणि सुरक्षित होईल यात शंका नाही.

व्हॉट्सॲपने गेल्या दोन-तीन महिन्यात अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत.त्यामध्ये व्हिडिओ कॉलमध्ये 33 लोकांना समाविष्ट करण्याची सुविधा जी गुगल मीट आणि झूमला टक्कर देणारी होती.तसेच स्पॅम मेसेज आपोआप ब्लॉक करणारे नवीन फीचर,व्हॉट्सॲप कलरफुल करण्याचे फीचर,अवतार,पर्सनल चार्ट हाईड करण्याचे आणि मेसेज शेड्युल करण्याचे फीचर तसेच सध्या विकासाच्या टप्प्यात असलेले इंटरनेट नसतानाही फाईल शेअरिंग करण्याचे फीचर आणि एआय यांसारखे अनेक फीचर कंपनीने लॉन्च केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT