Whatsapp Download Quality Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये धमाकेदार फीचरची एन्ट्री; तुमच्या मोबाईलचं स्टोरेज फुल होणार नाही, पण कसं? पाहा एका क्लिकवर

Whatsapp Download Quality Feature : व्हॉट्सअ‍ॅप लवकरच 'Download Quality' नावाचं नवं फिचर आणत आहे, ज्यामुळे वापरकर्ते HD किंवा SD मीडिया डाउनलोडमध्ये निवड करू शकतील.

Saisimran Ghashi

Whatsapp Update : प्रत्येक स्मार्टफोन युजरला हल्ली एकच त्रास फोन स्टोरेज भरतंय आणि काही डिलीट केल्याशिवाय नवीन फोटो/व्हिडिओ सेव्ह होत नाहीत. विशेषतः WhatsApp वापरकर्त्यांना हा त्रास अधिक जाणवतो. हे लक्षात घेऊन WhatsApp लवकरच एक महत्त्वपूर्ण अपडेट आणत आहे Download Quality नावाचं नवं फिचर.

काय आहे हे ‘Download Quality’ फिचर?

WhatsApp वरून दररोज असंख्य फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स शेअर केल्या जातात. अनेकदा हे मीडिया HD क्वालिटीमध्ये ऑटो डाउनलोड होत असल्याने फोनचं स्टोरेज झपाट्याने भरतं. ही अडचण सोडवण्यासाठी WhatsApp आता वापरकर्त्यांना एखाद्या फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करताना त्याची क्वालिटी (HD की SD) निवडण्याचा पर्याय देणार आहे.

कुठून करता येणार सेटिंग?

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, Android व्हर्जन 2.25.18.11 च्या बीटा अपडेटमध्ये हे फिचर टेस्टिंगसाठी दिसलं आहे. वापरकर्ते Settings > Storage and Data > Auto-Download Quality या मार्गाने जाऊन ‘HD’ किंवा ‘SD’ हे पर्याय निवडू शकतील.

स्टोरेज बचतीसाठी मदत

या नव्या फिचरमुळे तुम्हाला कोणती मीडिया फाइल कोणत्या क्वालिटीमध्ये सेव्ह करायची हे ठरवता येईल. त्यामुळे अनावश्यकपणे HD फाइल्समुळे फोन भरून जाण्याची समस्या कमी होईल. त्याचबरोबर डेटा वापरही कमी होईल, हे विशेष.

सध्या बीटा टेस्टिंगमध्ये

हे फिचर सध्या बीटा युजर्ससाठी मर्यादित आहे. मात्र टेस्टिंग यशस्वी झाल्यावर लवकरच हे अपडेट सर्व अँड्रॉइड आणि iPhone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

WhatsApp चं हे नवं अपडेट छोटं वाटत असलं तरी ते वापरकर्त्यांच्या दैनंदिन अनुभवावर मोठा सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. जास्त मीडिया शेअरिंग आणि मर्यादित स्टोरेज असलेल्या मोबाईल्ससाठी ही सुविधा म्हणजे एक दिलासा ठरणार आहे. यामुळे WhatsApp वापरणं अधिक स्मार्ट, सुलभ आणि कस्टमायजेबल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT