Whatsapp
Whatsapp esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp : Whatsapp बँक खातं काढायचंय ?ही आहे सोप्पी ट्रिक

Pooja Karande-Kadam

WhatsApp हे अतिशय प्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप आहे. फोनमध्ये  WhatsApp नसलेला क्वचितच एखादा सापडेल. मेसेज पाठवणे, फोटो-व्हिडिओ किंवा कॉल करणे याशिवाय WhatsApp ने ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. व्हॉट्सअॅपने काही दिवसांपासून फोनवरून पेमेंट सुविधाही सुरू केली आहे.

WhatsApp च्या या UPI आधारित पेमेंट सेवेद्वारे युजर्स कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्याही मित्राला सहजपणे पैसे पाठवू किंवा मागू शकतात. तुम्ही ही सुविधा सहज वापरू शकता. जर तुम्हाला ही सेवा वापरायची नसेल, तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून लिंक केलेले अकाउंट डिलीट देखील करू शकता.

व्हॉट्सअॅप UPI 2018 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. ते वापरण्याची पद्धत गुगल पे, पेटीएम इत्यादी सारखीच आहे. प्रत्येकजण या WhatsApp पेमेंट सेवेचा वापर अगदी सहज करू शकतो. जेव्हा तुम्ही WhatsApp उघडता आणि 3 डॉट्स असलेल्या आयकॉनवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला ही सेवा मिळेल. याद्वारे तुम्ही सहज पेमेंट करू शकता.

जिथे पेमेंटचा पर्याय दिसतो. त्याच वेळी, तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल. तुम्ही WhatsApp च्या या पेमेंट सिस्टमबद्दल समाधानी नसल्यास किंवा ती वापरू इच्छित नसल्यास, तुम्ही त्यासाठी लिंक केलेले बँक खाते काढून टाकू शकता.

विशेष म्हणजे बँक खाते WhatsApp मधून काढून टाकणेही सोपे आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही दुसरे अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.

कसे काढाल बँक खाते

  • तुम्ही प्रथम व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा.

  • त्यानंतर पेमेंट्स पर्यायावर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला बँक खाते दिसेल, त्यावर टॅप करा.

  • आता तिथे तूम्हाला बँक खाते दिसेल.

  • तुम्ही तुमचे बँक खाते WhatsApp Pay वर क्लिक करून काढून टाकू शकता.

कसे सेव्ह करायचे बँक अकाऊंट डिटेल्स 


तुम्हाला रुपीचं चिन्हं उजव्या कोपऱ्यात दिसेल. तिथे क्लिक करा तिथे तुमचं UPI अकाऊंट किंवा बँक खातं लिंक करा. ज्या पद्धतीनं तुम्ही खातं Add केलं तशाचं पद्धतीनं तुम्ही ते खातं काढू देखील शकता. 

तुम्हाला जर प्रायमरी अकाऊंट बदलायचं असेल तर काही सोप्या टिप्स वापरा. ‘मोर ऑप्शन्स’ निवडा त्यानंतर पेमेंट पर्याय निवडा. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला जे अकाऊंट प्रायमरी करायचं त्यावर क्लिक करा. ज्या पद्धतीनं Gpay किंवा फोन पेमध्ये आपण प्रायमरी अकाऊंट सेट करतो अगदी तिच पद्धत इथे वापरायची आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT